मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
मृत्यू येइल जेधवां पसरुनि...

संशय - मृत्यू येइल जेधवां पसरुनि...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


मृत्यू येइल जेधवां पसरुनि विक्राळ दाढा पुढें,
जेव्हां त्या बघुनी थरारुनि मनीं चैतन्य हो बापुडें;
जेव्हां बुद्धि (नुरे;) धृतीहि विधरे, श्रद्धा विचारी मरे,
जेव्हां झांपड येऊनी जनिं मनीं अंधार सारा भरे -
तेव्हां कोण करील सोबत मला हा प्रश्न चिंत्तांतरीं
मी पाहे पुसुनि पुन:पुनरपी, अंधार सारा परी !
स्वर्गाचीं रमणीय भाजवरी जीं स्वप्नें मनीं पाहिलीं.
प्रेमाचीं बरवीं हृदंगम अहा गणीं किती गाइलीं !
अज्ञानें परि वाहिलें निजमनीं ज्या ईश्वरालागुनी,
साहया त्या समयास तो तरि अहो येईल का धांवुनी ?
नाना प्रश्व असे उठून करिती जेव्हां मना व्याकुळ,
त्यांतें शांत करील अदभुत असें आहे कुणा का बळ ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP