मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
निंब जांब जांभळ शेंदरी । ...

वनमुकुंद - निंब जांब जांभळ शेंदरी । ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


निंब जांब जांभळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी ।
जणुं काय ती येई धांवुनि । असेंच वाटे पहा साजणी ।
पुढें पाहिलीं खैरीं झाडें । तशीच मोठी मेंदी वाढे ।
जाइजुई ती फार वाढली । गुंफा मोठी बहुतचि झाली ।
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली । तिला ऐकुनि वृत्ति निमाली ।
काय कथूं त्या सुस्वर नादा  । पुढें पाहिलें रम्य मुकुंदा ।
गोपांनीं तो वेष्टित झाला । गळीं फुलांचा हार शोभला ।
कटिं पीतांबर सुंदर दिसला । गोप खेळती नाना लीला ।
कितिक खेळती आटयापाटया । कितिक खेळती दांडु विटया ।
अशा करिति ते नाना लीला । देवहि भक्ताआधिन झाला ।
वाटतें जावें, तत्कमलमुखा पाहावें ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP