TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
जीवित संशय जिकडे तिकडे जी...

जीवित संशय जिकडे तिकडे - जीवित संशय जिकडे तिकडे जी...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


जीवित संशय जिकडे तिकडे
जीवित संशय जिकडे तिकडे
जीवाचें या कोड पडे
हृदय धडधडे । मेघ कडाडे
चित्तावरती वित्त जडे ।

चित्त भडकलें
दु:ख कहरलें
शून्य जहालें भ्रांतींत

विश्व प्रेममय
जीव प्रेममय
तत्व मनाला हें गवसे

हया तत्त्वाचा पाठपठण मी
करितां करितां जीव नवा

द्दष्टिस पडला
मनीं वाढला
घ्यास मना कां लागावा

मुखावरचे गुलाब फुंलले
फुलले झुलले तुझिया प्रेमाने

स्वैर तरंगीं
बनलें रंगी
तुझिये अंगीं तें गाणें

होईं जागा
दे मज जागा
अभागिनीला घे पदरीं.

(प्रसंग : एका निद्रिस्त तरुणाला त्याची प्रिया जागृत करण्यासाठीं म्हणते)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:51.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कह्मा

  • पु. ( हिं ) आज्ञा ; हुकुम ; म्हणणे ; सांगणें . ' कहे तुका जग भुलारे । कहा न मानत कोय । - तुगा ४२९ . ( सं . कथं ; प्रा . कह ) कह्मांत -( कह्या , सप्तमी ) आझेंत ; हुकुमांत ; ताब्यांत . ( क्रि०असणें ; राहणे ; वागणें ; चालणें .) 
  • ०कह्यांत क्रि . तांब्यांत , हुकुमांत नसणें . 
  • नसणें क्रि . तांब्यांत , हुकुमांत नसणें . 
RANDOM WORD

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.