TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय ५६

श्रीगणेशाय नमः ॥

मुक्तिदायक कृष्णौषध ॥ भवरोगिया जाण सिद्ध ॥ परि अभाविक पाखंड अबुद्ध ॥ अलक्ष करिती स्वधर्मी ॥१॥

पूर्वाध्यायी शंकरसुत ॥ सांगे संगमतीर्थ विख्यात ॥ जेथे भार्गव पवित्र चरित ॥ सनकादिकाला कथियले ॥२॥

पुढे जाहली काय कथा ॥ तीच सांगतो तुम्हा आता ॥ ऐका देवोनिया चित्ता ॥ म्हणे नारदमुनीसी ॥३॥

संगमापासोनिया जवळ ॥ तीर्थ ऐरावत निर्मळ ॥ जेथे ऐरावत दुर्मिळ ॥ ऐश्वर्य लाधे तपाने ॥४॥

पुढे धनद तीर्थ थोर ॥ कुबेर जेथे तप अघोर ॥ करोनि जाहला गुह्यकेश्वर ॥ लिंगतीर्थ तेथुनी ॥५॥

जेथे शत लिंग सिद्धसेव्य ॥ उदकामाजी असे दिव्य ॥ पश्चिमतटी विश्ववंद्य ॥ सद्योजात शिव असे ॥६॥

केले इंद्रे यज्ञ जेथ ॥ तेथोनि पुढे जटातीर्थ ॥ स्नाने जियेचे दुरित ॥ कोटि जन्मीचे जातसे ॥७॥

जेथे सिद्ध नामे जो मयूर॥ तेणे पूजिला श्रीशंकर ॥ म्हणोनि बोलती तीर्थमयूर ॥ जटातीर्थासीच हो ॥८॥

पुढे असे वृषभतीर्थ ॥ जेथे धनुक द्विजश्रेष्ठ ॥ भूमिदाने स्नाने विमुक्त ॥ ब्रह्मशापापासुनी ॥९॥

ब्रह्मशापे झाला बैल ॥ परी जातिस्मरत्व निर्मळ ॥ हे तो पुर्व सुकृताचे बळ ॥ मुनिदर्शने तत स्मरे ॥१०॥

फिरोनि जाहला तो ब्राह्मण ॥ मुक्ति पावला होवोनि ज्ञान ॥ तीर्थमहिमा यापरी जाण ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥११॥

पुढे तीर्थामाजी श्रेष्ठ ॥ नामे भीमालिंगतट ॥ जेथे असे नीलकंठ ॥ सूक्ष्मलिंग शरिरी ॥१२॥

पुढे असे तीर्थचित्र ॥ कथा जयाची अति विचित्र ॥ होता राजर्षि नामेहि चित्र ॥ छात्र मार्कंडेयाचा ॥१३॥

तो एकदा गुरुजवळी ॥ येवोनि पुसे बुद्धांजुळी ॥ जे का कर्मज्ञानमाउली ॥ तीर्थ सांगा ते गुरो ॥१४॥

जेथे अर्पिता बिल्वपत्र ॥ की घालिता अन्नसत्र ॥ सकल सुख इह परत्र ॥ मिळे सांगा ते गुरो ॥१५॥

ऐशी ऐकोन शिष्यवाणि ॥ म्हणे मार्कंडेय मुनी ॥ छायाक्षेत्री पुण्यखाणी ॥ तीर्थ देवह्रद असे ॥१६॥

ऐसे ऐकता सवेंचि चित्र ॥ छायाक्षेत्री जावोनि मात्र ॥ तप करी सुकृश गात्र ॥ कृष्णा तोषली तदा हो ॥१७॥

म्हणे बापा काय इच्छा ॥ आहे तुझी हे सांग वत्सा ॥ येरू ऐकोनि मधुर वाचा ॥ बोले नमोनि तियेसी ॥१८॥

कर्म जे का प्राणियाने ॥ केले शुभाशुभ ते जाणणे ॥ धर्मासनाधी बैसोनि लिहिणे ॥ हेचि माते देइ हो ॥१९॥

परिसोनि यापरी चित्रमात ॥ म्हणे तथास्तु जगन्मात ॥ तुज्ञे लेख्यासि नाम गुप्त म्हणोनि चित्रगुप्त तू ॥२०॥

ऐसे बोलोनि जाहली गुप्त ॥ गेला स्वर्गासि चित्रगुप्त ॥ छायाक्षेत्र हे ऐसे अदभुत ॥ म्हणे शंभुसुत मुनीसी ॥२१॥

उत्तरेसी द्विधा भिन्न ॥ कृष्णा देवनदी जाण ॥ एक देवह्रदाभिधान ॥ दुजे गंगाद्वार पै ॥२२॥

तो देवह्रद असे जेथे ॥ जातिस्मारक छायाक्षेत्र ते ॥ पुत्रखेदे वसिष्ठ तेथे ॥ येवोनि पावे सुख बहू ॥२३॥

बहुत तीर्थे हिंडला होता ॥ परि छायाक्षेत्रासि येता ॥ स्वस्थ वाटोनिया चित्ता ॥ पद्मासनस्थ तप करी ॥२४॥

गेले यापरी कित्येक दिन ॥ तव एकदा होवोनि श्वान ॥ विश्वामित्र करी गमन ॥ मेनकेचे पाठिशी ॥२५॥

छायाक्षेत्रावरोनि जाता ॥ पाहे वसिष्ठ तव अवचिता ॥ खदखदा हासोनि म्हणे चेष्टा ॥ काय ही हो विनिंद्य ॥२६॥

आजपर्यंत केले तप ॥ फळ तयाचे श्वानरूप ॥ कष्टे मेळवी कस्तुरी अमुप ॥ शौचार्थ जेवी मूढ जो ॥२७॥

क्षेत्रमुक्तीचे जे शरीर ॥ ते तरी आहे क्षणभंगुर ॥ भोग म्हणोनि मूत्रपात्र ॥ तपोनाशकर सेवेसि ॥२८॥

बापा सावध हो सावध ॥ नको करू हा तपोवध ॥ ऐसे ऐकताचि सावध ॥ झाला विश्वामित्र तो ॥२९॥

होवोनिया हा पूर्वस्मृती ॥ टाकी श्वानशरीर निगुती ॥ आणि होवोनि दिव्यकांती ॥ नती वसिष्ठा करितसे ॥३०॥

स्कंद बोले मुनिवरांसी ॥ एकदा तो कौशिक ऋषी ॥ म्हणे वसिष्ठे आपणासी ॥ ब्रह्मर्षी ऐसे वदावे ॥३१॥

हेतू यापरी धरोनि पोटी ॥ तप करी तो कृष्णातटी ॥ परी वसिष्ठे तया शेवटी ॥ राजर्षि ऐसे बोलिले ॥३२॥

तेणे विश्वामित्र भारी ॥ संतप्त जाहला निजांतरी ॥ म्हणे सृष्टी रचीन दुसरी ॥ माझे तपाची थोरी हे ॥३३॥

परी राजर्षी मला म्हणतो ॥ म्हणोनि याला ठार करितो ॥ म्हणोनि यापरी गाधिसुत तो ॥ शिळा मोठीच घेतसे ॥३४॥

तव पश्चाताप चित्ती ॥ होवोनि खाली शिळा ठेवी ती ॥ म्हणे वसिष्ठ मेलियावरुती ॥ ब्रह्मर्षी कोण म्हणेल ॥३५॥

ऐसा विचार कौशिकाचा ॥ जाणोनिया धव अरुंधतीचा ॥ म्हणे ब्रह्मर्षी तू साचा ॥ जाहलासी निश्चये ॥३६॥

परिसोनि यापरे अमृताक्षर ॥ विश्वामित्र तोषला फार ॥ आलिंगोनिया परस्पर ॥ गेला निजाश्रमा तो ॥३७॥

वसिष्ठ राहोनिया तेथे ॥ पूजी छायाभगवतीते ॥ प्रसन्न होवोनि मग तयाते ॥ दिधले तियेने दर्शन ॥३८॥

तेणे आनंदोनि मनी ॥ तेथेचि राहिला वसिष्ठ मुनी ॥ गंगाद्वारी कृष्णावेणी ॥ ऐसी भक्तासि मोक्षदा ॥३९॥

तेथे पीत निल सित ॥ आहेत कुंडे सुविख्यात ॥ उदक तयांचे मस्तकी घेत ॥ ब्रह्मलोका जाय तो ॥४०॥

अनघ तीर्थ कन्याह्रद ॥ देवर्‍हद सोमह्र्द ॥ पुढे जाणिजे सूर्यह्रद ॥ विष्णुलोकद भाविका ॥४१॥

वालखिल्य साठ सहस्त्र ॥ बदरिकाश्रमी तपस्वीवर ॥ करोनि ब्रह्मया नमस्कार ॥ प्रश्न करिती एकदा ॥४२॥

अहो असे की तीर्थ पावक ॥ जे का बदरीहूनि अधिक ॥ तदा विधाता म्हणे एक ॥ देवह्रद असे हो ॥४३॥

बदर्याश्रमी श्रीविष्णुचे ॥ केले तप गौरिहराचे ॥ दहा सहस्त्र वरुषे तायचे ॥ पुण्य देवह्रददर्शने ॥४४॥

तपे प्रयागी सहस्त्रहायन ॥ तदा देवह्रद दर्शन ॥ जेथे एक विप्रभोजन ॥ कोटिभोजन पुण्यद ॥४५॥

कन्याह्रदी दोन प्रहरी ॥ देव दुंदुभिनाद भारी ॥ जया ऐकता क्षणभरी ॥ पुत्रपौत्रादि होय हो ॥४६॥

पूर्वी मोहनीरूप हरी ॥ अमृत घेवोनि आपुले करी ॥ राहे जावोनि गिरीकंदरी ॥ वंचवाया दितिसुता ॥४७॥

मायामोहिनी विष्णुमाया ॥ डोहा निकट पडे छाया ॥ देखोनि देव तया ठाया ॥ आले अमृत प्यावया ॥४८॥

मग पाजिले तया अमृत ॥ परी दैत्यांसि ते न दिसत ॥ जेथे इंद्रादि सुर समस्त ॥ राहती सुरडोह तो ॥४९॥

गिरिगृहेचे उत्तरेसी ॥ अद्यापि छाया दिसे कैशी ॥ वाटे जणू ह्रषीकेशी ॥ मुर्तिमंत मोहिनी ॥५०॥

छायास्वरूपी जगदीश्वर ॥ जेथे म्हणोनि छायाक्षेत्र ॥ प्रयाग नैमिष कुरुक्षेत्र ॥ न सरी जयाची पावती ॥५१॥

यापरी मार्कंडेय ऋषी ॥ सांगे आपुले शिष्यवर्गासी ॥ तोचि नारद म्हणे तुम्हांसी ॥ मी हा इतिहास वर्णिला ॥५२॥

पुढे कथा असे गोड ॥ ऐकता पुरती मनीचे कोड ॥ कृष्णापदाची मेळवा जोड ॥ द्वाड विषयसंग हा ॥५३॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ छपन्नावा अध्याय हा ॥॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये छायाक्षेत्रवर्णनं नाम षटपंचाशत्तमोऽध्यायः ॥५६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:28:27.4570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

amphicarpic

  • Bot. (having two kinds of fruits) द्विफलिक 
RANDOM WORD

Did you know?

घर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.