मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३७

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३७

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

पाखंडकाजवा डोल मिरवी ॥ नुगवला जव कृष्णारवी ॥ जो का अरुण भाविकाकरवी ॥ आधीच हरवी तमाते ॥१॥

स्कंद म्हणतसे बहुत सुंदर ॥ कृष्णाकथा ही अगोदर ॥ श्रवणी होता तुम्ही सादर ॥ पापपदर नुरेचि ॥२॥

याज्ञवल्क्यासह व्यास ॥ नमोनि वीरभद्रेश्वरास ॥ तेथोनि आला लिंगतीर्थास ॥ रुद्रतीर्थास तेथुनी ॥३॥

पुढे जावोनि योगतीर्थी ॥ दोघे योगेश पूजिती ॥ तेथोनि गेले गर्गतीर्थी ॥ गर्गेश दृष्टी देखिला ॥४॥

आगस्त्यतीर्थी पुढे आले ॥ आगस्त्येशासि पूजिले ॥ तीर्थ पराशर मग पाहिले ॥ उभयतांनी मुनी हो ॥५॥

तेथे करोनिया स्नान ॥ पराशरेश्वरदर्शन ॥ उदकांतरी जाज्वल्यमान ॥ करोनि पूजिती उभयता ॥६॥

तदा याज्ञवल्क्यासी ॥ व्यास सांगे या कथेसी ॥ येथे पिता माझा तपासी ॥ पूर्वी करिता जाहला ॥७॥

सूर्यमंडल मध्यंतरी ॥ असे जो का साक्षात हरी ॥ तया देखे सदा उपरी ॥ उभा राहोनि सारखा ॥८॥

गदा शंख सुदर्शन ॥ हाती जयाचे देदीप्यमान ॥ मकरकुंडलविराजमान ॥ मेघवर्ण असे जो ॥९॥

वनमाला जया कंठी ॥ असे पीतांबर कटी ॥ करी कटके शोभती जया गोमटी ॥ कनककांती असे जो ॥१०॥

येवोनि पराशरजवळी ॥ म्हणे माग वर इंदुमौळी ॥ येरू म्हणे गा खूण पटली ॥ वनमाळी तू एकचि ॥१३॥

परी नृसिंहवीण कवणा ॥ कदा न करी मी याचना ॥ सदा सेविजे वैकुंठराणा ॥ आज्ञा यापरी गुरूची ॥१४॥

ऐसे ऐकोनि चंद्रशेखर ॥ म्हणे श्रीहरी करुणाकर ॥ देईल दर्शन तुला लवकर ॥ निर्धार हाचि असो दे ॥१५॥

बोलोनि ऐसे मृत्युंजय ॥ लिंगांतरी पावला लय ॥ फिरोनि मत्पिता ध्यानस्थ होय ॥ नृसिंहमय आवघा ॥१६॥

होता अखंड वृती यापरी ॥ प्रत्यक्ष जाहला श्रीनरहरी ॥ असे श्रीवत्सलक्षण उरी ॥ करी आयुधे शोभती ॥१७॥

पद्म गदा चक्र शंख ॥ असि पाश धनु कुंतक ॥ यज्ञसूत्र चर्म खेटक ॥ अक्षमाला धरियेली ॥१८॥

वरदाभय अमृतपात्र ॥ सोळा यापरी शोभती कर ॥ कांसे वेष्टिला पीतांबर ॥ कटी सुत्र विराजे ॥१९॥

झळके रत्‍नमय दिव्य कांची ॥ गळा माळा अंतरियाची ॥ मूर्ति ऐसी नरहरीची ॥ देखोनि देहचि अर्पिला ॥२०॥

म्हणे पराशर धन्य धन्य ॥ आजि फळाले सकल पुण्य ॥ डोळा देखिला तो वरेण्य ॥ लक्ष्मीरमण अहो मी ॥२१॥

येरू म्हणे गा लक्ष्मीपते ॥ नको राज्यदि नष्ट सुख ते ॥ मी म्हणावे पुत्र तूते ॥ याचि वराते देई भो ॥२३॥

बोले तदा भक्तपाळ ॥ होईन तुझा मी सत्य बाळ ॥ तुझे तपाने मज कळवळ ॥ आली मुनिवरा बा ॥२४॥

आख्यान ऐकता हे मंगल ॥ होतील मनोरथ इच्छिले सफळ ॥ पुढिले अध्यायी तीर्थ मंजुळ ॥ सांगेल बाळक शिवाचा ॥२५॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति अखंड ॥ सदतिसावा अध्याय हा ॥२६॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये नृसिंहकथावर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP