TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४७

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४७

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय ४७

श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णास्वातीचा जलधर ॥ भक्तशिंपीस मौक्तिककर ॥ दुर्जनसर्पिणीस विखकर ॥ उपाधिगुणेंचि विषम हो ॥१॥

स्कंद म्हणतसे मुनिवरांसी ॥ पूर्वाध्यायी कंकमुनीसी ॥ आले पहाया सकळ ऋषी ॥ ऐसे तुम्हांसि कथियेले ॥२॥

देखोनि म्हणती ते तयाला ॥ परोपकारार्थ तू तपाला ॥ करोनि घेतलेसि बा वराला ॥ कृष्णवेणीपासुनी ॥३॥

तू आहेसी ब्रह्मचारी ॥ तरी आता लग्नासि करी ॥ नंतर उग्र तप आचरी ॥ कृष्णा संतुष्ट होईल ॥४॥

होता संतुष्ट जगदंबिका ॥ मिळेल ते ते इच्छिसी जे का ॥ ऐसे सांगता तया कंका ॥ म्हणे काय तो ऋषींसी ॥५॥

अहो माता जगाची ती ॥ नसे मुनी हो मज माहिती ॥ जरी करोनि कृपादृष्टी ॥ दावाल तरी मग बरे ॥६॥

ऐसी ऐकोनि कंकवाणी ॥ करोनि विचारा एकमेकांनी ॥ याज्ञवल्क्या म्हणती मुनी ॥ दाविजे तूचि इयासी ॥७॥

यापरी परिसोनि याज्ञवल्क्य ॥ गंगासंगमी ध्यानस्थ होय ॥ नमन तियेसी भक्त माय ॥ दैत्यनाशक जी असे ॥८॥

ब्रह्मादि वंदिती जियेचे पदा ॥ मायावती इष्टवरदा ॥ शंख कमल परिघ गदा ॥ हाती जियेचे शोभती ॥९॥

बाण भृशुंडी शूल चक्रा ॥ धनुष्य मस्तक खड्‌गा करा ॥ सांख्यज्ञवर्या द्विपंचवक्रा ॥ कालहरा असे जी ॥१०॥

तपोमया जी त्रिदशैकनयना ॥ महामाया प्रियदर्शना ॥ महाकाली त्रिगुणवर्णा ॥ स्तविता तियेसी अवतरे ॥११॥

प्रेमे तदा याज्ञवल्क्य ॥ धरी तियेचे घट्ट पाय ॥ देवी म्हणे बा वरं वरय ॥ काय इच्छिसी मानसी ॥१२॥

ऐसी ऐकोनि गोड वाणी ॥ संतोषोनि म्हणे मुनी ॥ हे भक्तवरदायिनी ॥ त्रयीमये अंबिके ॥१३॥

राहोनि कृष्णातटी तुवा ॥ भक्तमनोरथ पूरवावा ॥ याही कंकासि भोग आघवा ॥ द्यावा मोक्षही दयेने ॥१४॥

तथास्तु म्हणोनि महाकाली ॥ कृष्णातटी मग राहिली ॥ याज्ञवल्क्य जोडोनि अंजुळी ॥ म्हणे तियेसी पुनरपि ॥१५॥

अहो माते ही तमोमूर्ती ॥ देखोनिया जन भय पावती ॥ म्हणोनि सौम्य रूपाप्रती ॥ धरी भक्तवत्सले ॥१६॥

यापरी परिसोनि मुनिबोल ॥ देवी जाहली शीघ्र कोमल ॥ वाटे प्रत्यक्ष दया केवळ ॥ आली असे ये स्थळी ॥१७॥

झळके मुक्ताहार कंठी ॥ सूत्र विराजे जिचे कटी ॥ तेजे गमे सूर्यकोटी ॥ प्रगट जाहली काय हे ॥१८॥

चतुर्भुजा कात्यायनी ॥ देवी महिषासुरमर्दिनी ॥ विराजिती चौसष्ट योगिनी ॥ पद्मासनी बैसली ॥१९॥

नमन करितो तदा तीते ॥ देवि गरुडारूढे नमस्ते ॥ देवि वृषभारूढे नमस्ते ॥ नमस्ते हंसवाहिनी ॥२०॥

ब्रह्मरूपिणी त्राहि त्राहि ॥ कल्याणी मां पाहि पाहि ॥ कृष्णातटी हो सदा राही ॥ विनंती ही आमुची ॥२१॥

ऐकोनि यापरी जगदंबिका ॥ म्हणे स्तोत्रासी या जे का ॥ पढती स्तविती भाव निका ॥ पदी माझिया ठेवुनी ॥२२॥

तयांचे दुःख नष्ट होय ॥ आयुष्य आरोग्य आणि द्रव्य ॥ लाधेल यापरी कार्तिकेय ॥ मुनिवर्यसंघा म्हणतसे ॥२३॥

भौमवारी अष्टमीसी ॥ शुक्रवारी चतुर्दशीसी ॥ नवमी आणि पौर्णिमेसी ॥ घेता दर्शन सकलद ॥२४॥

ऐसे बोलोनि कृष्णातटी ॥ राहे शिवाची ती गोरटी ॥ होता जियेची कृपादृष्टी ॥ भुक्तिमुक्ति मिळतसे ॥२५॥

कंकही भृगुकन्येला ॥ भार्या करोनि सुत लाधला ॥ भोगी ऐश्वर्य इंद्रादिकाला ॥ दुर्लभ देवीकृपेने ॥२६॥

याज्ञवल्क्यादि सकल मुनी ॥ जगदंबिकेची पूजा करोनी ॥ कवण ठायासि गेले तेथुनी ॥ उत्तराध्यायी वर्णिले ॥२७॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सत्तेचाळिसावा अध्याय हा ॥२८॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कंककथावर्णनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥४७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:28:12.2470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

saddle coil

  • बैठक कुंडल 
RANDOM WORD

Did you know?

mahameruyantrachi shastrashudh mahiti sangavi. Gharat thevnyasathiche mahameruyantra pokal ki bhariv ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.