TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
निद्रा सुन्दर आणि सुन्दर ...

तुटलेले दुवे - निद्रा सुन्दर आणि सुन्दर ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
निद्रा सुन्दर आणि सुन्दर किती मृत्यू तिचा बान्धवा !
गेला साङगुनि हें जगाप्रति पुरा विक्षिप्त कोणी कवी;
ज्याला श्री वश होऊनी मिळवुनी दे प्रीतिचें वैभव,
ऐत्साही हृदयीं तदीय असली ऐक्ती जणू वीख वी.
कीर्तीच्या सनऊतुनी तरि निघे तोण्डांतली वाफ ना ?
जीवाहूनि महाग, आणि वश हो पैक्यासती होऊनी;
कीर्तीची मज कय चाड म्हणतां प्रीती मला साफ ना ?
भिक्षेच्या पुढती तिच्या मज गमे स्वर्सम्पदा हो ऐणी.
अर्थात मी परकी जनांस न लगे स्वीयांस जेव्हा नको,
धुण्डूनी परदेश केवि ह्रदया लाभे जिव्हाळा तिथे ?
पाहूं वाट ? कशास, कोठवर ती ? आशाच देवा, नको !
होऊं काय भिकार भूत पडलीं वेचावयाला शितें ?
निद्रा प्रीतिपरीच सोडुनि मला राही सुखेनैव ती;
मृत्यो, सुन्दरता तुझी तरि बधूं दे, हो सखा शेवटीं.

७ डिसेम्बर १९२६

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:27.9200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बगलागिरी

  • स्त्री. विशिष्ट पाहुण्यांनां देण्यांत येणारा आलिंगनाचा मान ; भेट . ( बगल + गिरी ) 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.