TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
सोन्याचें तव हें घडयाळ सख...

तुटलेले दुवे - सोन्याचें तव हें घडयाळ सख...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
सोन्याचें तव हें घडयाळ सखये, देशी मला कासया ?
याची हीणवणूक कां ? खचित हें शोभे न रडकास या.
आहेत स्मृति ज्या खचून भरल्या दुष्पूर माझ्या मनीं
होती सर्वच त्या सुवर्णमय गे स्पर्श तुझ्या साजणी.
या निर्जीव अलडकृतीवर पहा न प्रेम माझें ठेर
दिव्यालङकरणें खुले बहु जरी सौन्दर्य तूजें खरें;
या तूज्या विभवीं कितीक असती जे अंशभागी तुझे
दे हें त्यांस, मला तुझें स्मित पुरे, काही न देऊं दुजें.
लोकांनी म्हटलें किती जरि मला ‘हा क्षुद्र निष्काञ्चन !’
चिन्ता ती न करींच मी, मनिं कधी त्याची शिवे आच न;
सोन्याचें स्मित मुग्ध हार्दिक तुझें राहील माझ्यावर
सन्तोषें अमरावतींतहि तरी राहीन मी पामर.
का या भेटिमधे असे ध्वनि तुझा काही तरी मङगल ?
सोन्याचा क्षण सावधान धर हा, जाऊल हा चञ्चल.

२३ मार्च १९३४

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:24.6400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भुकी राखे चौथा कोन

  • भुकी तो सुखी. " ‘ काय श्याम, झालें का जेवणखाण ? ’ त्यानें विचारलें. ‘ आज काळे याच्याकडे गेलों होतों. फराळ झाला. पोट भरलें आहे. ’ शिवाय, भुकी राखे चौथा कोन अशी म्हणहि आहे, मी हंसत म्हटलें. ‘ भुकी तो सुखी ’ सखाराम म्हणाला. " -साने गुरुजी, जीवनकलह पान ७७. भुकी पहा. 
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.