मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
मित्रा, कां धरिलेंस मौन ?...

तुटलेले दुवे - मित्रा, कां धरिलेंस मौन ?...

सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.


मित्रा, कां धरिलेंस मौन ? ऊतुकी का प्रेमवल्ली तव
होती नाजुक की वियोग शिवतां सारें  तिचें वैभव
होऊ राखच ? वात घातकच तो त्याला न माया दया, -
नाही का ऊपकार फेड करण्या वा देणगी द्यावया ?
सम्बन्धी तुझिया विचार अवघे माझे सदा जागृत
जाणों नैष्ठिक दास तप्तर तुझ्या सेवेस अव्याहत;
स्वार्थी वा अनुदार फार म्हणजे ही एक हृद्वासना -
दे सौख्यांश तुला पुरूनि ऊरला ही ऐवढी याचना.
पक्ष्यांनी त्यजिलें हिमेंहि भरलें, निष्पर्ण झाडावरी,
आशा त्या घरटयाहुनीहि तुझिया शब्दामुळे हो जरी
माझें चित्त उदास आणिक सुनें, ज्याने दिला आश्रय
पूर्वी स्नेहसुखां अनेक - नलगे आता तयाचें भय !
मित्रा, बोल तथापि, बोल म्हणजे जातील शङका लया,
व्यापूनी हृदया मदीप करिती माझे किती हाल या !

९ जुलै १९१९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP