तुटलेले दुवे
होती वस्तु असङख्य सुन्दर जरी काव्यकृतिप्रेरक
होऊ प्रेरक गे स्मृतीच मजला तूझी मनोवेधक;
त्या पुण्यस्मृतिभोवती विरचितों शृङगार रङगीत मी,
लोभे पाहूनि थाटमाण्ड जन, मी गौरीच चित्तीं नमी,
भूषावेषतर्हाप्रसङग फिरवीं मी बाहय खाणाखुणा,
सूक्ष्मत्वें बघतां तुझाच दिसुनी आदर्श येऊ कुणा;
कोणी धाष्टर्य करूनि नाव सुचवी की ओळखीचें तुझें,
मी हें सिद्ध करा म्हणूनि म्हणतां घेऊ त्वरेने दुजें.
माझें पाहुनि या सुनीतरचनीं कौशल्य किंवा यश
जाती बोलुनि कौतुकें कुणि कुणी “हो शारदा या वश”
ऐकूनी स्तुति मर्मभेदक अशी मी “काय हें ?” जों म्हणें]
तों “वृत्ती तुमची विनीत” म्हणती, “शोभे असें बोलणें,”
तूतें ही कविता कळेल तरि का हृद्रक्तनिस्यन्दिनी ?
वाची मार्मिक कल्पना लढवुनी गे कोण दैनन्दिनी ?
१४ मे १९३०
Translation - भाषांतर
N/A