TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
मी पाहूनि विभूति दोन नमलो...

तुटलेले दुवे - मी पाहूनि विभूति दोन नमलो...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
मी पाहूनि विभूति दोन नमलों त्यांच्यापुढे तत्क्षणीं -
येती थोर अजूनिही सुत असे या हिन्द भूच्या कुशीं !
दोघेही गुरु - शुक्र, मित्रच म्हणा, दोघे विचाराग्रणी,
तो त्यागी कृश ऐक आणि दुसरा हा राजयोगी ऋषी,
दाढीदार सतेज शान्त वदनीं गाम्भीर्य हें प्रेमळ,
अङगीं नाजुक सैल रेशमि झगा, टोपी शिरीं मख्मली,
त्याची क्षीण तपाळ मूर्ति, किति तहदहास्यीं महन्मङगल !
नेसे तो निजहातकातिवसुती कौपीन जाडी भली.
हा गीताञ्जलिने दिगन्त पसरी हिन्दीमनोवैभव.
स्वच्छी पश्चिमपूर्वयोग, निवडूं पाहे खरी संस्कृती,
तो सत्याग्रहशूर वीर पडला बन्दींत सत्यास्तव.
अघ्यापी नव राज्यनीति, पटवी स्वाङगें करूनी कृती.
हा ठाकूर रवीन्द्रनाथ मिरवे साहित्यसम्राट, पण
गान्धी मोहनदास पाहि वळवूं दारिद्रयनारायण.

२२ सप्टेम्बर १९२२

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:50:25.8730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नऊ कारभारी, अठरा चौधरी

  • [चौधरी-चौगुला=एक ग्रामाधिकारी] ज्या गांवांत घरांत सर्वच कारभा जो तो पाहातो तेथे सर्वव गोंधळ होतो. अनेक मालक असले म्हणजे ऐकहाती कारभार नसल्यामुळें अव्यवस्था हाते 
  • निर्नायकी. 
RANDOM WORD

Did you know?

वास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.