TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
का नाहीतच सुस्वरूप तुझिया...

तुटलेले दुवे - का नाहीतच सुस्वरूप तुझिया...

सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.


तुटलेले दुवे
का नाहीतच सुस्वरूप तुझियाहूनी स्त्रिया भूवरी ?
का आहेतच सर्वही विमुख त्या ? जों तू दुरी ठेविशी
तों तेडेपण हें पहा हृदिं जसें क्षारत्व सिन्धूदकीं,
साहूनी अपमान खोल हृदयीं ही प्रीति वाढे पिशी.
होतां पेठुनि खाण - तेल भडका, पाणी जरी शिम्पिलें
तें पाण्यावरती तरङगुनि जळे, ज्वाला बसेना, कुठे;
जैसा दीप विझे तसा न वणवा वा सूर्य झञ्झानिलें;
बोले भानु, “कितीहिइ तोण्ड फिरवो पृथ्वी, न कक्षा सुटे.”
येथे मीच शशीसमान घिरठया घालीं तुझ्या भोवती,
अन्तर्व्याधिमुळेच लागति मनीं आशेस नाना कळा;
अन पुष्पांस अनेक चुम्बित अली वार्‍यावरी पोहती
लाभे त्यांस ‘रसज्ञ’ थोर पदवी - वा न्याय हा आगळा !
तू डोळे भलतीकडे फिरवुनी मर्मास या भेदिशी,
हे पुष्पाङिग ,रसज्ञ मार्मिकच तू, कां रक्त माझें पिशी ?

२० जुलै १९२६

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:23.7170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

  • उद्गा . संबोधन 
  • अ. अथवा ; वा . व चोळावे पत्ळ मोडे । - वैद्यक ७६ . [ सं . वा ] 
  • वर्णमालेतील एकोणतिसावे व्यंजन . अक्षरविकासः - पांच अवस्था . पहिली गिरनार शिलालेखांत , दुसरी व तिसरी ख्रिपू . 
  • उअ . आणि . आणि आणि व या दोन उभयान्वयींत फरक असा की , एका विधानांत किंवा एक क्रियापद असतांना दोन किंवा अधिक पदे किंवा कर्ते या दोघांनाहि जोडले जातात . उदा० तो आणि ( व ) मी आलो ; दिवस आणि ( व ) रात्र सारखीच . पण जेव्हां भिन्न गोष्टीए दाखविणारी , किंवा एक वाक्य कारण , आधार इ० व दुसरे परिणाम , शेवट इ० दाखविणारे अशी वाक्य जोडतांना व ऐवजी आणि चाच उपयोग करतात . उदा० मी आलो आणि तो गेला ; सूर्य उगवला आणि मी उठलो ; तो काळा आणि हा गोरा . भोजशक ४१० मधील मंगळवेढ्याच्या ताम्रपटांत हा आढळतो . [ अर . व . तुल० सं . उत - उअ - व , याप्रमाणे संस्कृतसदृश्य प्राकृतांतून व फारसीत गेला . - भाअ १८३५ ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site