TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
मैत्रीचा सहजी निघे विषय त...

तुटलेले दुवे - मैत्रीचा सहजी निघे विषय त...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
मैत्रीचा सहजी निघे विषय तो सम्भाषणौघामधी,
तच्चेतोनयनापुढे मग ऊभी राहुनि मित्राकृती
येतत्कण्ठ भूरूनि, तो मज म्हणे : “पूजार्ह त्याची स्मृती.
मृत्यूनेच दुराविलें जगिं तया, दुर्वार तो पारधी.
गेले दीस किती सुखांत असतां सङगें जिवाचा सखा !
गोष्टी बोलत ती पहाट कितिदा होऊनि गेली बरें !
दे अद्यापि अमूर्त सङगत मुकी तो पूर्वमैत्री स्मरे, -
आहे भाव तसाच गाढ अमुचा कृष्णार्जुनासारखा.”
झाला तो मग गप्प आणिक बघूं माझ्याकडे लागला,
जन्माचें मम होय नाटक असें शोकान्त, साङगूं कसें ?
डोळ्यांनी बघतों दुरूनि तुज तों जीवास काही ड्से,
योगांतील वियोग साहुनि पुरा हा जीव वैतागला.
ये तूझाच विचार निष्क्रिय यदा मी ऐकला रात्रिचा,
मित्राचा पुरवेल अन्त, न लगे केव्हाहि तो मैत्रिच.

१० ऑगस्ट १९२३

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:25.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शायी

  • स्त्री. १ शाई ; लिहिण्याच्या उपयोगाचें रंगीत पाणी ; २ मृदंगाला लावण्याचें लुकण . शाई पहा . 
  • a  That sleeps. In comp. Ex. शेषशायी, जलसायी. 
  • वि. निजणारा , आडवा होणारा , टेंकणारा . शाई पहा . ( समासांत ) भू - शेष - सुख - जल - वृक्ष - शायी इ० [ सं . शी - शय् ‍ ] 
RANDOM WORD

Did you know?

Gharamadhye Shriramachi ani marutichi pooja karavi ka ? baykani keli tar chalate ka ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.