तुटलेले दुवे
आकाशांत फुलें, फुलेंच पवनीं, भूमीवरीही फुलें
फेका द्दष्टि हवी तिथे - अपुवनीं रानीं सरींही फुलें,
हीं आहेत फुलें म्हणूनिच जगीं वाटे हवेसें जिणें,
वैराग्यक्षय लागुनी मृति बरी वाटेल यांच्याविणें.
कोणी दावुनि रङगरूप अपुलें चित्ता करी दुर्मद,
कोणी नि:श्वसितें हवेंत पसरी माधुर्य शान्तिप्रद.
कोणी राहति शुन्द दुर्लभ पदीं, जाती ऊडूनी दुजीं,
कोणाला कर लाववे न, पुसती आहेत का हीं तुझीं ?
कोणाचें न फुलेल हृत्सुमन हो पाहूनि ही माधुरी,
हेलावे न सहानुभूति, न कशी जावी निराशा दुरी ?
जीवाला वनवास हा पुरवला, हें फूल हासो क्षण,
माझा जीव करीन यावरुनि मी मोठया सुखें औक्षण.
या ऐकीकडल्या दरींतिल गुणी र्हीरम्य साध्या फुला,
दे माज्यास्तव सोडूनि क्षण तरी सङकोच हा आपुला.
११ ऑक्टोबर १९३२
Translation - भाषांतर
N/A