TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
वाक्स्वातन्त्र्य असे म्हण...

तुटलेले दुवे - वाक्स्वातन्त्र्य असे म्हण...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
वाक्स्वातन्त्र्य असे म्हणूनि वमतां ज्वाला मुखांनी तुम्ही,
राळेचाच परन्तु डोम्ब पसरे चोहीकडे धूम हा !
मेघाडम्बर अम्बरीं गडगडे, विद्युत करी ताण्डव,
खाली म्लान महीवरी तृषित या बिन्दूहि कां ना पडे ?
आक्रोशींच ऊदात्त खर्च तुमची सारी पडे रुस्तुमी,
गोविन्दात्मज माधवास म्हणतां वाचाळ भीरु महा -
आता कां वरदक्षिणेस हटतां, दाक्षिण्य दावा नव,
जा प्रेमास वरा, धनार्थ करितां कां द्दष्टि आप्तांकडे ?
काव्यात्मत्व वरूनि तें ऊतरुनी ये मात्र युष्मदहृदीं,
घ्येयांची सगळी मिरास अथवा जाणों तुम्हां गावली,
यायोगेंच सुधारकी वदतसां दुर्दम्य हीं दुर्वचें,
छे, कल्लोळ करी प्रचण्ड तुमचा आव्योम शब्दाम्बुधी !
द्यायाला दिसतां समर्थ न तुम्ही वा ऊबा वा सावली,
कारुण्यास्पद मात्र मी समजतों तारुण्य हें तूमचें !

२३ फेब्रुबारी १९२९

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:26.6700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

pock marking

  • पु. वण 
RANDOM WORD

Did you know?

गंध का लावावे ? अधिक माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site