TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
कोणाच्याहि पुढे कधी न नमल...

तुटलेले दुवे - कोणाच्याहि पुढे कधी न नमल...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
कोणाच्याहि पुढे कधी न नमलें गर्विष्ठ माझें शिर,
केलें मीं न खुलें कुणासहि कधी दुर्भेद्य हृन्मन्दिर.
माझ्या आन्तर जीवनास न शके काढूं कुणी बाहिर.
स्वातन्त्र्यप्रिय आत्मनिष्ठच सदा मी अद्रिवत स्तुस्थिर.
तेजस्वी पड्तां कटाक्ष तव मी झालों मनीं कम्पित,
वाटे थेट जिव्हार विन्धुनि तुवां केलें मला अङिकत.
तू गेलीस जवें, सवेंच हृदय़ीं प्रक्षुब्ध हो सञ्चित,
गेला ऊर फुटून, पूर सुटला, हो लोक आनन्दित.
तो आनन्द मला कुठे ? न परते गेलीच ती देवता.
लोकांचेंच करीत सान्त्वन परीतो ओघ वाहे अता.
माझें मी बनलों प्रचण्ड थडगें जाणूनिया नेणता,
झालों ऊन्च जगीं कशास जर मी राहायचा ऐकटा,
तें सायुज्य कधी घडेल पुसतों साहूनि ही दुर्दशा,
तों ये ऊत्तर मर्मभेदि वरुनी - हेटाळणीचा हशा !

६ जून १९२२

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:24.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

transcendental element

  • अबैजिक घटक 
RANDOM WORD

Did you know?

जर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.