TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
भोळा ऐक किशोर हासत तुवां ...

तुटलेले दुवे - भोळा ऐक किशोर हासत तुवां ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
भोळा ऐक किशोर हासत तुवां जाळ्यामधे ओढिला
अन सम्बोधुनि त्यास ऐक समयीं श्रीशारदा - किङकर
तू प्रीत्यङकुर लाविला वरसुनी द्दग्वाक्सुधाशीकर
झाळ्यानन्तर आणभाक तरु तो तू लीलया मोडिला.
त्याला ओठसुरा विलासचतुरे आधी तुवां पाजिली.
जातां झिङगुनि तो कठोर हृदयें केलें दुरी त्याजला;
‘आहेस प्रिय तू परी खचित ये पन्ती न व्हाया मला”
याचा अर्थ मुळी न त्यास कळला, त्वत्प्रीति झाली शिळी.
आविर्भूत तुझ्यामधेच पहिली प्रीती तयें पाहिली
यासाठीच हलाहलासम तुझें चाञ्चल्य तो प्राशुनी
घेऊ शामक रामनाम, जगती वाटे तयाला सुनी;
दावी शान्त गभीरता वरि जरी हो अन्तरीं काहिली.
तत्प्रेमास अपात्र तू कळुनि तो कष्टी असाधारण,
तू त्याला लहरींत नाम दिधलें नेमें करी धारण.

२ जून १९२३

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:25.3730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Over charges

 • जादा खर्च 
RANDOM WORD

Did you know?

विनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.