तुटलेले दुवे
होशी यौवनमत्त मूर्ख तरुणा, होऊल दुर्लौकिक
याची भीति न तूज, त्यांत ऊलटा वाटे तुला गौरव.
केव्हा लोकमतास भीत पुजुनी हातीं न ये घ्येय तें
देशी यास्तव तू झुगारुनि तया आधीच वार्यावर.
ग्रासायास रवीस ऊन्च ऊडतां तो अञ्जनीचा सुत
गेले देव विरुद्ध, वज्र सुटले, तो भूवरी कोसळे;
सीतामुक्ति करावया झगडतां तू त्या जटायूपरी
वेगाने तुजला दशानन तळीं निष्पक्ष पाडील रे.
स्वार्थी तू म्हण, लेख तुच्छ जनता तत्त्वास जी विन्मुख,
तूतें हा अभिमान, वैश्य नच मी तोटानफा मोजण्या,
बाणा हा, नच वाकणार लवही भङगूनि जावों भला !
रे दुर्योधन, माण्ड मोडिल तुझी ती भीमसेनी गदा.
घे माझी अनुभूति ही, तुज जिता चालेल हा मृत्यु का ?
मेल्यानंतर काय पूज्य पुजल्या गेल्या जरी पादुका !
१५ मार्च १९२४
Translation - भाषांतर
N/A