मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
सीताहरणानंतर रामाचा वियोग

सीताहरणानंतर रामाचा वियोग

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - (इसतन धनकी या चालीवर.)

अयिलक्ष्म परम विनीता ॥ हा हा क्वस्ते सीता ॥
अयिलक्ष्म क्वचिविगीता ॥ हा हा क्वस्ते सीता ॥
अयिलक्ष्म केनच नीता ॥ हा हा क्वस्ते सीता ॥
अयिलक्ष्म दूरमतीता ॥ हा हा क्वस्ते सीता ॥
बहु विठ्ठल कविना गीता ॥ हा हा क्वस्ते सीता ॥१॥

रावणानें जानकी चोरून नेल्यावर मारुती सीता शोधार्थ लंकेंत जातो जानकीं, रावणच्छलानें अति दु:खी होऊन, वेणीनें गळफांस घालुं इच्छिते; तों, मारुती शिंशपावरून उतरून आपण खरा रामदूत आहें, अशी तिची खात्री करण्यासाठीं राममुद्रिका पुढें ठेवितो आणि म्हणतो.

पद - सीताशुद्धींतील. इसतन धनकी या चालीवर.

मात: स्वामिनी सीताबाई ॥ संशय न मनिं धरावा कांहीं ॥धृ०॥
त्रिभुवन पालक रविकुल राजा ॥ करुणासागर स्वामी माझा ॥ मात:० ॥१॥
दूत मी विभुचा सुत पवनाचा ॥ सुग्रीवाचा सचिव मी साचा ॥ मात:० ॥२॥
त्यज हे मुद्रा दु:खदरिद्रा ॥ दिधली प्रभुनें घ्यावी मुद्रा ॥ मात:० ॥३॥
संतोषे ती त्रिजगन्माता ॥ विठ्ठलपंतहि तें यश गातां ॥ मात:० ॥४॥

ती मुद्रिका रामाचीच अशी ओळखून जानकी शोकाकुल होते व मुद्रिकेस रामकुशल विचारिते.

पद - मुद्रिका - राग - पिलु जिल्हा.

सुखी कीं रामराजा ॥ सखे सांग मुद्रे, सुखी कीं रामराजा ॥धृ०॥
मी एक पापिणी गे, मुकलिसें रामपाया ॥ परि तुवां कैसा त्यजिला, सखाराम माझा ॥ सु० ॥१॥
गांजिति राक्षसी हया, परि तें मी सांगुं कायी ॥ विसरलें दु:ख सारें, तुझिया दर्शनें ॥ सु० ॥२॥
राम मनिं राम ध्यानीं वचनींइ चापपाणी ॥ पंतविठ्ठलाख्य कविची. एषाहि पूजा ॥ सु० ॥३॥

रामरावणयुद्धांत शक्तिप्रहारानें लक्ष्मण व्याकुल होतो, त्यास अंकीं घेऊन राम शोक करितो.

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP