मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
रामराज्य वियोग

रामराज्य वियोग

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


रामराज्य वियोग प्रसंगीं कौसल्यादि स्त्रिया कैकेयीस म्हणतात.

पद - राग कालंगडा ताल झंपा.

कां माझ्या बाळावरि निष्ठुर इतुकीगे ॥ कैकेयीबाई ॥
धांडु नको रघुराज वनाप्रति ॥ लागतों तुमचे पायीं ॥ कां० ॥धृ०॥
सर्वस्वीं अपराधी तुझे आम्हि ॥ घालुनि पोटीं साहीं ॥
या संभारें राज्य समस्तहि ॥ भरताप्रति तूं देईं ॥ कां० ॥१॥
या रामांच नवनीताहुनि ॥ कोमल तर पद पायीं ॥
दंडक कानन कंटक दुर्गम ॥ जाय कसा त्या गो पायीं ॥ कां० ॥२॥
पाहि विभो मां विठ्ठल केलें ॥ दुष्कृत तरि असे कांहीं ॥
या परि विनवितसे परि अंतरि ॥ लेश दयेचा गे नाहीं ॥ कां० ॥३॥

पद खमाज किंवा असावरी.

रथारूढ रघुराय झाला ॥धृ०॥
सुरवर विद्याधरकिन्नरवर ॥ स्थिरचर वंदिति पाय ॥ झा० ॥१॥
भ्रष्ट धृष्ट परि पुष्ट नष्ट मति ॥ दुष्ट करिति हायहाय ॥ झा० ॥२॥
श्याम मनोहर नयनिं निरखितां ॥ निखिल दुरित चय जाय, ॥ झा० ॥३॥
जयजयकार करुनि ज्या पूजिति ॥ सज्जन जनसमुदाय ॥ झा० ॥४॥
भुक्ति मुक्ति सुविरक्ति भक्तिला ॥ नलगे अन्य उपाय ॥ झा० ॥५॥
संतत शंतम पंतविठ्ठल ॥ प्रेमें यद्यश गाय ॥ झा० ॥६॥

कैकेयीनें आग्रहपूर्वक रामास दंडकारण्यांत पाठविलें. पुत्र वियोगानें दशरथ स्वर्गवासी झाला. हें आपल्या मातोश्रीचें अनुचित वृत्त पाहून क्रोधानें व्याप्त होऊन भरत म्हणतो.

पद - राग जोगी (माझा कृष्ण या चालीवर.)

इजला माय म्हणावें काय ॥ केवळ कृत्या ही ॥धृ०॥
जगदानंद जिणें रघुराय ॥ नीलोत्पलदल - कोमल - पाय ॥
विपिना घालविला अन्याय ॥ त्रिभुवन हाय हाय करी ॥ इज० ॥१॥
ऐसें सत्य इचें मनिं आणा ॥ ही तो राक्षसी स्पष्ट जाणा ॥
दशरथराय जगाचा राणा ॥ वृद्ध प्राणा सांडविला ॥ इज० ॥२॥
श्रीरामाचा करोनि कांटा ॥ रचिल्या तीन तिघांमधिं वाटा ॥
पदरीं पातकाचा सांठा ॥ या पोटां म्हणूनि आलों ॥ इज० ॥३॥
मजवरि विटेल राम अनंत ॥ कैसा काय होइल पंथ ॥
ऐसी भरत करित बहु खंत ॥ विठ्ठलपंत हंत म्हणे ॥ इज० ॥४॥

राम, लक्ष्मण जानकीसह अत्रिऋषीच्या आश्रमांत गेल्यावर तत्पत्नी अनुमूया इनें, सीतेची वेणीफणी करीत असतां, तिचा स्वयंवर वृत्तांत विचारल्यावरून तो जानकी सांगते.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP