मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| आख्यानांत अवश्य लागणारी कविता श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती आख्यानांत अवश्य लागणारी कविता अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा आख्यानांत अवश्य लागणारी कविता Translation - भाषांतर पद - रामजन्माचें - राग सारंग.(अमोल काया जाइल वाया) या चालीवर.पुष्पसमय मधुमास पुण्यतम शुक्लपक्ष तिथिते नवमी ॥ रवि मंगल गुरु शुक्र शनैश्वर ग्रह होते हे उच्चतमीं ॥कर्क लग्न नक्षत्र पुनर्वसु मेषराशिगत खररश्मी ॥ उदगामिजीवेंदु मध्यदिन असतां संकुल कुसुमींहृत्पद्मी द्दढयोग युङमुनि चिंतिताति ज्या यमनियमीं ॥ चिन्मय निष्कल एक शुद्ध इति विविध गाइला जो निगमीं ॥ भक्तकामकल्पद्रुम तो प्रभु करुणरसें पूर्ण द्रवला ॥ श्रीमदयोध्यानगरीं दशरथराजगृहीं हरि अवतरला ॥१॥सांद्रपयोधरश्याम - मनोहर - रूप जया मन्मथ लाजे ॥ हिरेजडित शिरपेंत तुरा वरि शिरीं किरीट बरवा साजे ॥भाळिं तिलक कविजना न वदवे कुटिलालककृत शोभाजे ॥ मकराकृति कुंडलें श्रवणयुगिं सुप्रसन्न लोचनजलजें ॥इंदुवदन नवकुंदरदन शुचि मंदहास अधरीं भ्राजे ॥ ग्रामत्रय मधुरिमार्थ कंठीं जडला जणु रेखाव्याजे ॥ मौक्तिकहार उदार सुभोभित मध्यें कौस्तुभ मणिरुळला ॥ श्रीमदयो० ॥२॥कटींतटीं उद्दाम पीतपट मंजु किंकिणी गजबजती ॥ जानुजंघ सुकुमार गुल्फयुग वलयनूपुरें रुणझुणती ॥ सहज मृद्दंग आरक्त पदतलध्वजादि चिन्हें विराजती ॥ रम्यमनोहर सरळु अंगुली पूर्ण चंद्रसी नखकांती ॥ त्रिभुवन कलुष क्षपण निपुणतर मंदाकिनि झुळझुळ स्त्रवती ॥ पादयुगुल यत्क्षणिक चिंतनें कर्मबंध सहसा तुटती ॥ दिव्यरूप पाहतां जननिच्या प्रेमपूर हृदयीं भरला ॥ श्रीमदयो० ॥३॥प्रसन्नदिक्चक्रवाल सुंदर मंद गंधवह संवहती ॥ स्वयें हुताशन आयतनात: प्रदक्षिणार्चि: प्रज्वलती ॥ श्रृंगारुनि गृह रत्नतोरणें नागरिक ध्वज उभारिती ॥ द्वारपरिमरीं कुंभदासिका शांति कुंभजल निषिंचति ॥ उजळुनि दीपज्योति कारुजन नीराजनविधि आचरति ॥ वारवधू सालंकृति नाचति मंजुल हरिहर गुण गाती ॥ तननं तननं धिगिति धिगिति धिक् थय्य थय्य रव घुंबरला ॥ श्रीमदयोध्या नगरीं दशरथराजगृहीं हरि अवतरला ॥४॥रामानें कौसल्येस प्रथम चतुर्भुजरूप दाखविलें. तेव्हां कौसल्येनें स्तवन करून, प्राकृत बालकवत् होण्याची प्रार्थना केल्यावर, पूर्व जन्मवृत्त सांगून रामानें शिशुत्व धारण केलें त्याविषयीं कव्युक्ति. N/A References : N/A Last Updated : January 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP