मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| पश्चात्तापपर पद श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती पश्चात्तापपर पद अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा पश्चात्तापपर पद Translation - भाषांतर पद - पश्चात्तापपर (प्राप्त होय जें निधान) या चाली०उत्तम जन्मा येउनि रामा गेलों उगा वाया ॥दुष्टपातकी शरण मि आलों सत्वर तव पाया ॥धृ०॥आधीं चुकलो मुकलो मी निज वेद स्वाध्यायाकर्में श्रौतस्मार्त न घडलीं सद्नति साधाया ॥पुराण परिसुनि सादर झालो यशहि न तव गाया ॥स्वस्थपणें कधिं नाहीं फावलें तुजला पूजाया ॥१॥आर्जविलें बहु लवण भंजनें व्याहया जावाया ॥क्षुधित अतिथि कधिं नाहीं घेतला प्रेमें जेवाया ॥उदार कर कधिं केला नाहीं पैसा एक द्याया ॥नाम फुकटचें तें हि आलें स्वामी वदना या ॥ उत्तम० ॥२॥कपट करुनिया निपट भोंदिल्या बहुत आया बाया ॥केली धनगृह क्षेत्र स्त्री पशु शिशुवर बहु माया ॥नित्य सजविली वसन भूषणें निंद्या ही काया ॥सिद्ध ठेविली सदाहि रसना सज्जन निंदाया ॥ उत्त० ॥३॥वटवत निशिदिनि केलि चहुंकडे मन हें रमवाया ॥केलें स्नान न संध्या जपतप दुष्कृत शमवाया ॥क्षणहि न केला साधु समागम भवदव निववाया ॥सद्य: कामुक झालों पाहुनि परधन परजाया ॥ उत्त० ॥४॥नाहीं विद्या कला कुशलता तुजला रिझवाया ॥शुद्ध मधुर वाणीही नाहीं तुजला विनवाया ॥बुद्धिहि नाहीं न कळे कांहीं शरणागत व्हाया ॥थकलि मजल सर्वथा दयाळा स्वहित आचराया ॥ उत्त० ॥५॥हरि कनबाळू करि दीनावरि करुणेची छाया ॥निगम नगारा गर्जे ऐसा निखिला कळवाया ॥यावरि विश्वासुनियां आलों जवळ तुझ्या पाया ॥सुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वामी रघुराया ॥उत्तम जन्मा येउनि रामा गे० ॥६॥पद - राग कापी ताल दीपचंदी. (संस्कृत)(भजभज गोपालं) या चालींवर.शुद्धं ब्रम्हापरं । वंदे सीतारामं ॥ शुद्धं ब्रम्हापरं ॥धृ०॥हैमवतीहर चित्त विरामं ॥ दिनकर वंशललामं ॥ वंदे सीतारामं ॥ शुद्धं ॥१॥पदरजौद्धृत गौतमवामं ॥ सजल पयोधरश्यामं ॥२॥विग्रहविभव विडंबित कामं ॥ विठ्ठल कुतुकाऽरामं ॥ वंदे सी० ॥३॥ Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP