मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
रामपरिवार प्रार्थना

रामपरिवार प्रार्थना

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - रामपरिवार प्रार्थना. (गडयाने घ्या हरिच्या० या चालीवर.)

मातर्जनक राजतनये । त्रिजगज्जननि सदय - त्द्ददये ॥
विनंती करुनि चित्त वळवा । प्रभुला केव माझि कळवा ॥धृ०॥
मारुतिराया बलभीमा । द्या मज हरिभजनीं प्रेमा ॥
अजि लक्ष्मणजी जगजेठी । करा मज राम चरण भेटी ॥ विनंती० ॥१॥
भरतजी एवढि करा सवडी । द्या मज रामपदीं आवडी ॥
शत्रुघ्नजी करा करुणा । दाखवा रामराय - चरणा ॥ विनंती०॥२॥
सुग्रीवजी भीड खर्चा । करा मज दास प्रभुघरचा ॥
लंकानाथ बिभीषणजी । द्या प्रभुपाशिं दाद माझी ॥ विनंती ॥३॥
अहो अंगदप्रमुख भक्त । घ्या मज आत्ममंडळांत ॥
विठ्ठलपंत उभा द्वारी । भिकारी दीन हाका मारी ॥ विनंती० ॥४॥

पद (येबा विठोबा सुखकंदा देवकि० चाल.)

श्रीरंगा, दे मजला सत्संगा आलों शरण तुला ॥१॥
रघुनाथा, आवडो तव गुणगाथा आ० ॥२॥
गोविंदा, सोडविं विषय छंदा आ० ॥३॥
स्वानंदा, विसरवि विषय छंदा आ० ॥४॥
श्रीकृष्णा, दूरकरीं धन तृष्णा आ० ॥५॥
रघुराया, आवरी आपुली माया आ० ॥६॥
गोपाळा, उघडीं चिन्मय डोळा आ० ॥७॥
श्रीरामा, दे मज भजन - प्रेमा आ० ॥८॥
घनश्यामा, नेईं मज निजधामा आ० ॥९॥
भगवंता, तारी विठ्ठलपंता आ० ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP