मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
सीतास्वयंवर

सीतास्वयंवर

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - उद्धवा सांत्वन या चालीवर.

आयके अये ऋषिजाये, मजवरिलें श्रीरघुरायें ॥धृ०॥
ब्रम्हानिष्ट मिथिलाधिपती, जनकाव्हय राजा सुकृती ॥
व्यास - याज्ञवल्क्यप्रभृती, मुनिजन यद्नुणगण गाती ॥
तो स्वयें एकदां सुमती, करुं इच्छी अध्वरवितती ॥ चाल ॥
शुत्ध्यर्थ भूमि नांगरतां ॥ लाभलें मि त्या शुभनिरता मानुनियां मज निज दुहिता ॥
पाळिलें नृपें सदुपायें ॥ आय० ॥१॥
जो कोणी वीर प्रतापी, गुण चढविल या शिवचापीं ॥
तो देव असो अथवाऽपी ॥ मानव वा दानव पापी ॥
ही कन्या त्या गुणवापी ॥ देइन हें वचन नभापी ॥ चाल ॥
पण दारुण ऐसा करुनी ॥ मनि धैर्यशिलोच्चय धरुनी ॥
श्रीहरिचें चरण स्मरुनी ॥ मांडिलें स्वयंवर न्यायें ॥ आय० ॥२॥
भूमंडळिं लिहिलीं पत्रें, मिळविले सकळ कुलगोत्र ॥
सोयरे आप्तजन मित्र  धावले वीर नृप पुत्र ॥
ऋषिमंडळ परमपवित्र, पातले पहाय चित्र ॥ चाल ॥
नवमणिमय मंडप साजे ॥ संपूर्ण मिळाले राजे ॥
नभिं गभीर दुंदुभि वाजे ॥ गणिकाजन मंजुळ गाये ॥ आय० ॥३॥
इतक्यांत आलाग बाइ मेला, दशवदन शैलसा ठेला ॥
सर्वांस त्रास उदियेला, त्याणें गर्व वाद बहु केला ॥
मग दावित भुजलीलेला, शिवकार्मुक सन्निध गेला ॥ चाल ॥
निज बाहुबळें बहु कढला ॥ परि नाहिं चापिं गुण चढला ॥
शेवटीं उरीं धनु पडला ॥ अंबिकादयेचे छाये ॥ आय० ॥४॥
भयचकित सर्व मग नृपती, कोणीहि न वर मुख करिती ॥
प्राथितां करुनिया विनती ॥ हूं म्हणतां कोणि न उठती ॥
हें पूज्य आम्हां धनु म्हणती ॥ कर जोडुनि दुरुनच नमिती ॥ चाल ॥
तव गर्जे मदुआध्याय ॥ निर्वीर भूति अजि काय ॥
शेवटां केविं पण जाये ॥ ऋषि मंडळिं मग तो पाहे ॥ आय० ॥५॥
रघुसिंहशाव तव उठला ॥ वीरश्रीविभवें नटला ॥
गुरुकृपाद्दगमृतें भिजला ॥ क्षण सस्मित पाहूनि मजला ॥
ठेउनिया गुरुपदिं निटिला ॥ ऋषिसंघ सर्व नमियेला ॥ चाल ॥
सावरुनी कुंतल जाला ॥ कटिं कशिला द्दढ मृगछाला ॥
शिवचापा सन्निध आला ॥ विप्राशीर्वाद सहायें ॥ आय० ॥६॥
नवपल्लव - कोमल - हातें ॥ उचलुनिया शिवचापातें ॥
द्दष्टिचें न लवतां पातें ॥ चढविलें चापिं सीतातें ॥
ओढितां सहज भंगातें ॥ पावलें लाज भूपातें ॥ चाल॥
वर्षती देव कुसुमांला ॥ मी अर्पियली वरमाला ॥
वंदिताम पादपद्माला ॥ आनंद न मानसिं माये ॥ आय० ॥७॥
धाडुनियां रथगजवाजी ॥ आणविले त्वरें मामाजी ॥
सौवर्ण मंडपामाजीं ॥ विट् - क्षत्र ब्रम्हासमाजीं ॥
नजकराय अध्वरयाजी ॥ राघवा अर्पिलें मजला ॥
जलसहित कनक समुदायें ॥ आय० ॥८॥
द्विजभुक्ति दक्षिणा मोठी ॥ मोत्यानें भरल्या ओटी ॥
खेळलों हळदफळगोटी ॥ सहभोजन विडिया होटी ॥
नामग्रहीं कौतुक पोटीं ॥ किती सांगुं सोहळे कोटी ॥ चाल ॥
प्रभुपंत विठ्ठलस्वामी ॥ जो नित्यनिरत निज धामीं ॥
हौनियां स्यंदनगामी ॥ मजसहित स्वपुरा जाये ॥
आयके अनुसूये, मज वरिलें श्रीरघुरायें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP