मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ५१ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ५१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत विघ्नराजावतारवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल तदनंतर सांगती । विघ्नदैत्याच्या गुप्त स्थानाची माहिती । अन्य कोणास नव्हती । परी गणनाथें तें जाणिलें ॥१॥त्या काळाच्या आश्रमांत । गणनाथ त्या समयीं जात । गुप्तरुप घेऊन त्वरित । अंकुश करीं घेऊनियां ॥२॥तें पाहून परम आश्चर्यविस्मित । देव सारें मनीं हर्षित्त । तेव्हां तो महाकाळ घेत । अग्नीचें रुप तत्काळ ॥३॥आपुलें रुप दडवून । गणेशाचा करी अपमान । अग्निरुप त्रैलोक्य व्यापून । सर्वत्र तेजतत्त्व भारलें ॥४॥विघ्नासुरावरी क्रुद्ध होत । गजानन संहारक वायुरुप घेत । तदनंतर काळ होत । आकाशतत्त्वीं विलीन ॥५॥वायुस्थ गणनाथा आकर्षित । दारुण तो विघ्नासुर अकस्मात । आकाशस्थ महाकाला जाणून ओढित । प्रभू गजानन सत्वरीं ॥६॥अहंकारधारक देव ओपित । प्रलयाकडे त्या दैत्या अवचित । तेव्हां विघ्नासुर घेत । महतत्त्वाचा आश्रय ॥७॥गजानन क्रुद्ध होऊन घेत । प्रधानाचें रुप समयोचित । महत्तत्त्वयुक्त विघ्नास ओढित । प्रभावें तें आपुल्या ॥८॥नंतर तो तो विघ्नासुर सोडित । महत्तत्त्व क्षणांत । गुणेशाचा आश्रय घेत । प्रधानस्थ गणेशा ताडन करी ॥९॥काळ तो परमदुर्जय अविनीत । गणेशासे ऐसें पीडित । तेव्हां गजानन साक्षात् बिंदूत । ब्रह्मस्थित जाहला ॥१०॥चतुष्पादमयी शक्ति टाकित । काळाचा करण्या अंत । गुणेशाहुन वरती नसत । म्हणोनि काळ खंडित विक्रम ॥११॥चतुष्पाद माया पाहून । काळ झाला भयभीत मन । महाघोट ती शक्ति हरण । करी कालच्या गर्वांचें ॥१२॥शेवटीं गणराजास शरण जात । काल पराजय स्वीकरित । महाविघ्नास समीप पाहत । विस्मित झाले देवमुनी ॥१३॥गणपाचा जयजयकारा करिती । त्याचें गुण सारे गाती । विघ्नासुर गजाननास भावभक्ति । प्रणाम करुनी पूजी तें ॥१४॥त्याच्या दर्शनें बोध होत । कृतांजलि तो स्तवन करित । गणनाथा तुज मी नमन । गजाननरुपा तुज वंदन ॥१५॥योगासी योगनाथासी । योग्यांसी योगदात्यासी । अनाकारासी साकाररुपासी । नानाभेदविहीना नमन ॥१६॥भेदपतींसी विघ्नेशासी । परेशासी काळभीती हर्त्यासी हेरंबासी परात्परासी । अनावीसी नमो नमः ॥१७॥अनाथासी सर्वांत आदिमूर्तीसी । भक्तेशासी स्वानंदवासीसी । भक्त वांछितप्रदासी । मूषकध्वजासी माझें नमन ॥१८॥मूषकावरी आरुढावरी । ढुंढिराजासी आद्यंतहीनासी । आदिमध्यांतस्वरुपासी । गजवक्त्रा तुज माझें नमन ॥१९॥सर्व पूज्यासी सिद्धिबुद्धि स्वरुपासी । सिद्धिबुद्धि प्रदात्यासी । सिद्धिबुद्धिपतीसी । महोदरा तुज नमन असो ॥२०॥अएयामायातिमूर्तीसी । सदा सुशांतिप्रदासी । पूर्णपतीसी मन वाचाहीनासी । तेजयुक्तासी माझें नमन ॥२१॥मनवाचा युक्त कालासी । नकळत घडल्या दोषां क्षमा कर्त्यासी । वंदन करी मीं तुजसी । रक्ष मजला भक्तियुक्तासी ॥२२॥दयाब्धे श्रेष्ठ वर देई मजसी । आता तुझें रुप उमजले मजसी । योगाकारमय तूं अससी । म्हणोनि मजला तूं जिंकिलें ॥२३॥तुझ्याविना कोण समर्थ असत । काळावर मिळवण्या प्रभुत्व जगांत । मी धन्य मज मानित । तव पादपद्माच्या दर्शनानें ॥२४॥ऐसी स्तुति महाविघ्न करित । गजाननासी आदरें नमित । त्यास वरती उठवून म्हणत । ऐसें वचन सर्वसार ॥२५॥महकाळा तूं रचिलेलें स्तोत्र सर्वप्रद । वाचिता ऐकतां सुखद । काळाचें भय दूर होय विशद । जें इच्छिलें तें लाभे ॥२६॥माझें हें स्तोत्र मज आवडतें । वाचितां महायोग लाभ घडविल ते । तुज मारण्या क्रोधयुक्त चित्तें । आलों होतों निःसंशय ॥२७॥परी आता तूं शरणागत । म्हणोनि तुज मी न मारित । माग जें असेल इच्छित । महाकाळ तेव्हां म्हणे ॥२८॥तुझी सुदृढ भक्ति देई । तुझ्या समीप मन नेई । दास म्हणोनी रक्षी नित्यही । कार्य माझें सांग ब्रह्मेशा ॥२९॥तें मी करीन सुयंत्रित । साधें स्थान तैसें भक्ष्य मजप्रत । सांग मजला हें समस्त । तुझ्या नामीं माझे नाम प्रथम ॥३०॥सर्वसिद्धिकर पूर्णयोगप्रद । होवो माझेही नाम सुखद । तेव्हां गणराज बोलले विशद । त्या उत्तम भक्तासी ॥३१॥त्याचें निर्विकल्प मन जाणून । भक्त प्रपालक बोले वचन । माझी अचल भक्ति मनीं ठसून । निष्पाप तूम होशील ॥३२॥जें जें तूं इच्छीसी । तें तें लाभेल तुजसी । माझा गण होऊन राहसी । बळसंयुत तूं सदा ॥३३॥महाविघ्न स्वरुपें नानाविघ्न गणयुक्त । विघ्नराज नामें मी ख्यात । होईन जगतीं निश्चित । तेणें तुझें नांव ये प्रथम ॥३४॥जेथ माझें कार्यरंभे न पूजन । तें कर्म तूं खावें निर्भय मन । सुरेंद्राकांसीही भ्रष्ट करुन । जरी ते मजला विसरती ॥३५॥शिवविष्णु प्रमुख देव । अन्य मुनिप्रमुख सर्व । मानवादी शेषादि नागराज अपूर्व । नानाजंतू मैत्रेयी ॥३६॥हे जरी होतील अहंकार मत्त । तरी असुरा त्यांना भक्ष्य तूं कर निश्चित । भ्रष्ट तयाप्रत । पीडा देई स्वच्छदें ॥३७॥माझी भक्ति जे करित । ते त्वां रक्षावे विशेष युत । त्यांच्या निर्विघ्नतेस्तव सतत । त्यांच्या पुढें तूं रहा ॥३८॥ऐसें बोलून अंतर्धान । नंतर पावले गजानन । विघ्नासुर विघ्नासहित शांत होऊन । आनंदित जाहला ॥३९॥देव मुनिजन स्वस्थानीं परतत । पत्नीसह पार्श्व पडे मूर्च्छित । त्या उभयतांच्या हृदयांत । प्रकटले गणाधीश ॥४०॥त्यांसी म्हणे तें अभय वचन । मीं चिंतामणिरुप हृदयीं विराजमान । पहा तुमच्या हृदयीं प्रसन्न । सदैव वसती हें जाणा ॥४१॥मूर्तीएं करुन पूजन । हृदयांत करता ध्यान । नित्य संतोष पावाल युक्तमन । यांत संशय मुळीं नसे ॥४२॥जेव्हां माझें स्मरण कराल । मातापित्यानो महाकार्यात सबळ । मजला तुम्ही पहाल । योगशांति लाभे तुम्हां ॥४३॥ऐसें बोलून अंतर्धान । गणेश पावला तें प्रसन्न । त्यांच्या हृदयांत विराजमान । तेव्हां तीं दोघें उत्साहित ॥४४॥मूर्ति स्थापून निरंतर पूजन । करिती ऐसें प्रेमे महान । गणराजाचें कथिलें पावन । चरित्र तुम्हां महान ॥४५॥गजाननाचेच अंश अवतार होत । वरेण्यपुत्र तोच अवतरत । एका वेळीं तो गजानन घेत । अवतार सिंदूरवधासाठीं ॥४६॥कल्पभेदानुसारें असती । नाना रुपें गजाननाची जगतीं । तीं सारें वर्णन करण्या शक्ति । कोणाचीही असेना ॥४७॥ऐसें अनेक भेद सिद्ध । गजाननाचे असती विशद । ते कोण जाणे वर्णील वा सुखद । सांग दक्ष प्रजापते ॥४८॥संक्षेपानें तुज निवेदिलें । पापनाशक हें चरित्र भलें । विघ्नराजाचे पराक्रम कथिले । भुक्तिमुक्ति फलप्रद ॥४९॥ओमिति श्रीमदामन्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते विघ्नराजावतारवर्णन नामैकपंचशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP