मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ३५ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ३५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत चतुर्थीउद्यापननिरुपणम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्गलाप्रत । कथिलें आपण चतुर्थीचें व्रत । आतां उद्यापन विधि मजप्रत । सांगावा जो फलप्रद ॥१॥मुद्गल तेव्हां त्यास सांगतो । उद्यापनाची रीती । व्रतारंभीं कोणी करिती । अथवा वर्षमध्यांत ॥२॥भाद्रमासी शुक्लपक्षांत । चतुर्थीचे उद्यापन उक्त । माघमासीं कृष्णपक्षांत । करावें उद्यापन शास्त्राधारे ॥३॥असतां वैभव उपासकाचें । त्यानें खांब आणावे केळीचे । महामंडप करुन तयांचे । तेज वाढवावें सर्वथा ॥४॥शोभा उत्तम करावी । द्रव्य असून कृपणता न दाखवावी । यथावैभव आचरावी । उद्यापनाची ही रीती ॥५॥छत बांधव उत्तम । तैसेचि आरसे मनोरम । लावून सर्वत्र दीपमाला अभिराम । मणिमोत्यांची आरास ॥६॥यथायोग्य व्रतधारकें करावी । सर्व शोभा ऐसी बरवी । शुक्लचतुर्थीव्रतसांगता करावी । माध्यान्ह काळीं दक्षप्रजापते ॥७॥कृष्णचतुर्थीचे उद्यापन । चन्दोदयीं करावें प्रसन्न । गोमयानें जमीन सारवून । त्यावरी रचावी धान्यराशी ॥८॥त्या धान्यराशीवरी अष्टद्ल कमळ । काढून त्या वर कलश निर्मल । सुवर्णाचा, रुप्याचा, तांब्याचा यथाबळ । मृण्मय कलशही स्थापावा ॥९॥दक्षा त्या कलशास वेष्टावें । दोन वस्त्रांनीं भक्तिभावें । त्यावरती मग ठेवावें । सुवर्णाचें पात्र उत्तम ॥१०॥त्यानंतर गणेशाचें यंत्र काढावे । वस्त्रावरी एका बरवें । तेथ गणपतिमूर्तिं स्थापून पूजावें । सर्वायवय धातुयुक्तरुप ॥११॥अनेक विंशति संख्य ब्राह्मण । बोलावून करावें पूजन । गणानां त्या या मंत्राचा जप करुन । होम करावा तदनंतर ॥१२॥हजार अथवा अर्धभाग । एकशें आठ अथवा जपाचा भाग । होमीं अर्पून गीतवाद्यादिक सुभग । दशरथा वेदघोष करवावा ॥१३॥नंतर नानाशास्त्र प्रवाद । ब्राह्मणांनी करावे सुखद । जेथ तेथ गणेशकथा मोदप्रद । सांगाव्या त्यांनीं प्रेमानें ॥१४॥नंतर पूर्णाहुती द्यावी । वसुधारा वाहवावी । बलिदान वायसादिक करावीं । समग्र विधिपूर्वक ॥१५॥एकवीस पक्वान्नें करुन । एकवीस संख्या प्रमाण । नैवेद्य देवास दाखवून । ब्राह्मण भोजन घालावें ॥१६॥विपुल दक्षिणा देऊन । सपत्नीक ब्राह्मणा बोलावून । स्त्रीजनांस कंचुकीप्रदान । भूषणदानही करावें ॥१७॥कृष्णचतुर्थीस अर्घ्यदान । करावें चंद्रास प्रसन्न । शुक्लचतुर्थीस वर्जत । अर्घ्याचें त्या करावें ॥१८॥प्रथम तिथीस अर्घ्यदान । नंतर विघ्नेशरा समर्पण । त्यानंतर चन्द्रास अर्घ्यदान । मंत्रपूर्वक तदनंतर ॥१९॥तिथींची माता तूं अससी । देवी सर्वार्थ तूं देसी । माझा अर्घ्य स्वीकारुन मजसी । पावन करी नमन तुला ॥२०॥ऐसें तिथीस प्रार्थावें । तदनंतर गजाननासी विनवावें । गजानना नमन तुज मनोभावें । नाना सिद्धिप्रदायका ॥२१॥बुद्धिपते अर्घ्य स्वीकारावा । मी दिलेला हा शुभप्रद मानावा । अत्रिगोत्रसमुद्भुत देवा । विनवावें नंतर चन्द्रासी ॥२२॥गणेशप्रीतिवर्धका घ्यावा । मी दिलेला अर्घ्य हा बरवा । रोहिणीत अमृतधारका द्यावा । मजला सर्व सौख्य ठेवा ॥२३॥कृष्णपक्षीं सदा रात्रीं भोजन । करावें व्रत साधकानें पुनीत मन । शुक्लपक्षांत पंचमी तिथीस बोलावून । ब्राह्मणांसी भोजन द्यावें ॥२४॥चतुर्थीस जागरण करावें । गणेशकथांचें गायन व्हावें । पंचमीस पूर्ववत पूजावें । नैवद्यादींनीं महामते ॥२५॥दीन अंध कृपणांस अन्नादिक । द्यावें यथाशक्ति निःशंक । ब्राह्मणांसी दक्षिणादिक । दान करावें श्रद्धेनें ॥२६॥सर्वांस भोजन घालून । तोषवावें देऊनियां दान । गणेशभक्ति दृढ व्हावी हें वरदान । मागावें त्यांच्याजवळीं तें ॥२७॥नंतर नमस्कारासहित । मूर्तो ती द्यावी स्वगुरुप्रत । एकवीस ब्राह्मणां भक्तियुत । कलश द्यावे त्या वेळीं ॥२८॥संतोषे उदारचित्तें सर्वांस । क्षमाभावें पाहून मनास । ध्यास लागावा सुरस । गणपतिभजनाचा सर्वदा ॥२९॥अनन्यभावें करावें मनन । ऐसें उद्यापन करुन । अंतीं संपूर्ण फल लाभून । ब्रह्मभूत तो भक्त होय ॥३०॥दक्षा या व्रताचें महिमान । वर्णन अशक्य मान । परी उद्यापनासहित विशेषें कथून । उपकृत केलें यथामती ॥३१॥ऐसें हें चतुर्थीचें चरित । जो नर ऐकत अथवा वाचित । त्यास विघ्नेश सदा देत । मानसेप्सित सर्वदा ॥३२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते चतुर्थ्युद्यापननिरुपणं नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP