मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय २४ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय २४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत ज्येष्ठकृष्णचतुर्थीवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । वैशाखी संकष्टीचें महिमान । ऐकिलें मीं पावन । आतां ज्येष्ठ संकष्टीचें माहात्म्य सांगून । उपकृत मजला करावें ॥१॥दशरथाची प्रार्थना ऐकून । वसिष्ठ सांगतो त्यास प्रसन्न । निषध देशांत महाभाग नल महान । तेजस्वी शस्त्रास्त्रसंपन्न ॥२॥शास्त्रज्ञ तो रुपवान । तैसाचि होता धनसंपन्न । चतुरंग बलान्वित असून । अन्य भूमिपाल करद त्याचे ॥३॥धर्मनीति न्याययुक्त । स्वयशें त्रैलोक्य भरित । इन्द्रलोकीं विधिलोकांत । कैलासांत चर्चा त्याची ॥४॥विष्णुलोकीं प्रशंसित । धर्मशीलता त्याची समस्त । त्रैलोक्य गमनीं आसक्त । साधुदर्शनीं तत्पर तो ॥५॥देवप्रिय अतिथींस पूजित । अंध दीनांसी पाळित । त्याची भार्या दमयंती ख्यात । अप्रतिम रुपयुक्त ॥६॥विशालाक्षी जगमोहिनी । अशक्य तिचे गुणवजीनीं । पुण्यश्लोक राजा नल स्वजीवनीं । कलीस जिंकी महायश ॥७॥एकदां कलिवश भ्राता जिंकित । द्यूतांत त्या नलराजास हरवित । म्हणोनि नलराजा जात । घोर वनांत त्यायोगें ॥८॥तेथेंही मत्स्यमिषें जणु प्रेरित । नळ दमयंतीस त्यागित । अर्धवस्त्रांत ती हिंडत । जनकसदनीं जावया ॥९॥एकाकिनी दुःखसमायुक्त । दुःखपूर्ण ती नलवर्जित । तीन वर्षे गुप्तरुपांत । वस्त्रार्धानें हिंडे नल ॥१०॥तो धर्मशील राजा कलिपीडित । पाहून नारद तेथ जात । त्यास पाहून राजा लज्जित । कृतांजली प्रणाम करी ॥११॥नारद जाणून त्यास लज्जित । म्हणे लाजूं नको नृपा गत । कर्माची विचित्र ऐशीच असत । सावधान चित्तें ऐक आतां ॥१२॥तुझ्या राज्यांत महाभागा व्रत । संकष्टीं चतुर्थीचें त्यक्त । म्हणोनि राज्यभ्रष्टता प्राप्त । तुजसी आली ऐसी स्थिति ॥१३॥जरी हें व्रत कार्यारंभांत । महाराजा नर न आचरित । तरी निरर्थक कर्म होत । समस्त त्याचें जगांत ॥१४॥चतुर्वण फलविहीन । झालास त्या व्रताभावें म्हणून । आता अवश्य करी यत्न । तें व्रत करण्या सिद्धिद ॥१५॥ऐसें बोलून महायोगी सांगत । माहात्म्य नळराजाप्रत । चतुर्थीचें शांतिप्रद पुनीत । ऐकूनि विस्मित नृप झाला ॥१६॥प्रार्थी नारदासी विनीत । गणेश्वर माहात्म्य सांगा मजप्रत । त्याचें भजन करीन मी निश्चित । तेव्हां नारद त्यास सांगे ॥१७॥गणेश्वराचें महिमान । शांतियोग फलप्रद पावन । वर्णन करण्या अशक्य महान । तथापि कांहीं तुज सांगतो ॥१८॥ब्रह्मा विष्णु शंभुशक्ति । सूर्य अमरा शेषनागादि जगतीं । कुलदैवत मानून भजती । गणेश्वरासी सदैव ॥१९॥अन्न प्राणादिक ब्रह्मे भजती । विशेषें त्या कुलदेवास जगतीं । महावाक्यांदिकांनी स्तविती । सुयोगदासा त्या वेद ॥२०॥सर्वसिद्धिप्रदा वर्तत । वामांगीं त्याच्या प्रकृति अद्भुत । पंच चित्तमयी बुद्धि विलसत । दक्षिणांगी तयाच्या ॥२१॥स्वानंदांत जयाची वसती । सर्व पूज्य ज्यासी म्हणती । सर्वादी गणनाथ ऐसी ख्याती । अंतीं एक तोचि राहे ॥२२॥गण समूहरुप असत । बाह्यांतर घेतलें जगांत । त्यांचा स्वामी गणेश ख्यात । त्यांस भज तूं विधानें ॥२३॥ऐसें सांगून षडक्षर मंत्र देत । गणेशाचा त्यास विधियुक्त । नंतर तो अंतर्धान पावत । गाणेशक महामुनि ॥२४॥नंतर तो नलराजा शार्दूल । हृदय करोनियां निर्मल । गजाननाचें ध्यान अमल । करुन मंत्र जपे सतत ॥२५॥आपणासी आपण निंदित । म्हणे कां न केलें संकष्टीव्रत । नंतर कर्कोटक त्यास चावत । देई अद्भुत वस्त्र तयासी ॥२६॥त्या योगें स्वेच्छास्वरुप प्राप्त । विरुप शरीर त्याचें सांप्रत । होऊनिया चित्तीं मुदित । ऋतुपर्णाकडे गेला ॥२७॥पित्याच्या घरीं वसत । दमयंती जी तिच्याकडून करवित । नारद संकष्टीचें व्रत । ज्येष्ठाअसीं योगायोगें ॥२८॥तीन वर्षे पूर्ण होत । नलराजा होता गुप्त रुपांत । चतुर्थीच्या पुण्यानें प्राप्त । झालें ज्ञान तयासी ॥२९॥तदनंतर ऋतुपर्णासी भेटत । आपुल्या श्वशुरांसी तो वंदित । नागवस्त्रानें पुनः घेत । स्वरुप आपुलें नलराजा ॥३०॥दमयंतीसहित जात । श्वशुरासह सेनेसहित । जेव्हां नल स्वनगरांत । भ्राता स्वागत करी त्यांचें ॥३१॥नंतर राज्य करी उत्तम । विघ्नहीन तो अभिराम । सर्व प्रजानन सुखधाम । जाहले हृष्टपुष्ट तेव्हां ॥३२॥ऐसा काळ जात बहुत । नलराजा स्वपुत्रास राज्य देत । सपत्नीक जाऊन वनांत । भजे अविरत गणनायका ॥३३॥अंतीं स्वानंदलोकीं जात । तेथेंच झाला ब्रह्मभूत । नलराजाच्या आज्ञेनें करित । जे जन व्रत संकष्टीचें ॥३४॥तेही शुक्ल कृष्ण चतुर्थी व्रत । करुन झाले सुखयुक्त । पुत्रपौत्रादींनी युक्त रोगवर्जित नराधिपा ॥३५॥अंतीं क्रमानें ते होत । ब्रह्मभूत जन समस्त । ऐसें हें माहात्म्य अद्भुत । ज्येष्ठ संकष्टी व्रताचें ॥३६॥आणखी एक वृत्तान्त । नृपा तुज सांगतो सांप्रत । या व्रताचा प्रभाव असत । वर्णिला त्या घटनेंत ॥३७॥मालव देशीं अत्यंज वसत । एक पापकर्मा अत्यंत । तो ब्राह्मणादींस गांठून वनांत । मारुन द्रव्य हरण करी ॥३८॥एकाकिनी स्त्री पाहत । तरी तो खळ तिसी भोगित । सती परनराचा स्पर्श होता त्यागित । आपुलें शरीर कित्येक ॥३९॥ऐसीं नानाविध पापें करित । जातिदूषण तो अंत्यज सतत । तीं असतीं वर्णनातीत । पापभोगभयें जाण ॥४०॥एकदां तो चांडाळ वनांत । शस्त्रधारी होता हिंडत । पाहून कोणा पुरुषा धावत । हनन त्यांचें करावया ॥४१॥तो भयसंकुल पळत । हाहाकार करी अविरत । प्राणभयें पळे त्वरित । तोच आले राजपुरुष ॥४२॥शस्त्रधारी तेथ आले । राजाचे अधिकारी जें भले । त्यांनी भांडण ऐकलें । कोलाहल तें बहु झाला ॥४३॥ते राजपुरुष त्या अंत्यजा पकडिती । निर्दयपणें ताडन करिती । बांधून राजासमोर नेती । नृप टाकी बंधनागारीं तया ॥४४॥त्या दिवशींचे दैवयोगें प्राप्त । ज्येष्ठ संकष्टी पुनीत । त्या दिवशीं अन्नविरहित । तुरुंगांत उपास त्यास घडला ॥४५॥दिवस ऐसा त्याचा जात । परी चंद्रोदय होतां रक्षकांप्रत । दया उपजून ते देत । अन खावया तयासी ॥४६॥तो दुष्ट होता क्षुधातुर । खाई तें अन्न आतुर । पंचमीस मारिती ठार । राजाज्ञेनें तयासी ॥४७॥तो अंत्यज मरतां होत । व्रत पुण्यबळें ब्रह्मभूत । ऐसेंचि नानाजन लाभत । ऐहिक भोग नानाविध ॥४८॥अंतीं होती ब्रह्मभूत । ऐसें अपार माहात्म्य असत । अशक्य वर्णन करण्या वाटत । परी कथिलें तुज कांहीं ॥४९॥हें ज्येष्ठ संकष्टीचें महिमान । वाचील वा ऐकेल मन लावून । त्यास ईप्सितफळ लाभून । अंतीं मुक्तिलाभ तया ॥५०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते ज्येष्ठकृष्णचतुर्थीवर्णनं नाम चतुर्विशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP