मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ४९ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ४९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत गणेशनिर्माल्यमाहात्म्यवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुदगलाप्रत । निर्मात्याचें माहात्म्य परम अद्भुत । ऐकिलें परी भान सांप्रत । पूर्ण संतोष न जाहला ॥१॥म्हणोनि विस्तारें पुन्हां सांगावें । त्या निर्मात्याचें कथानक बरवें । मुद्गल म्हणे हें वचन तुझें आघवें । संतोषजनक मज वाटे ॥२॥पराशरगृहीं देव गजानना । पुत्रभावें अवतरुन । क्रीडा करी जी महान । तें चरित कथिलें तुज पूर्वी ॥३॥पराशर तेथ स्थापित । आदरें मूर्ति अप्रतिम शोभायुत । सदासर्वदा सेवित । दक्षा तो त्या मूर्तीसी ॥४॥त्या स्थानीं येऊन पूजित । रात्रीं ब्रह्माविष्णु शिवादिदेव भावयुक्त । गजानना युधिष्ठिरासी भक्तियुक्त ।नित्यनेमें देवेश ॥५॥गजासुरवधापासून भक्तिसंयुत । स्वर्गपुष्पांचा उपहार अगणित । सुप्रसन्न मुखकमलें असत । त्या देवमुख्यांची ॥६॥एकदा कोणी राजर्षि येत । त्या स्थळीं मृगयासक्त । स्वसैन्यानें प्रधानांनी संवृत । वीरभद्रक नामें तो ॥७॥तो येऊन भक्तिभावें करित । गणेशाचें पूजन पुनीत । तेथेच रात्रीं निवसत । गाणपत्य तो महायश ॥८॥उषःकालीं येऊन । करी गजाननाचें पूजन । तेथ स्वर्गीय फुलें पाहून । विस्मित तो नृप झाला ॥९॥सुगंधी मंदारादी कुसमें पाहत । देवालय बंद करित । तेथ रक्षक ठेवून जागत । सेनेसहित रात्रीं त्या ॥१०॥देवदर्शनाची लालसा धरित । तें रात्रीं देवेंद्रमुख्त येत । राजास पाहून गुप्तरुपें पूजित । ते सारे गजाननासी ॥११॥पूजोनियां सर्व जाती । राजा तेथ येऊन पाहे उत्सुकमति । पूजा पाहूनि विस्मय अति । चित्तीं त्याच्या वाटला ॥१२॥प्रति रात्रीं ऐसें घडत । स्वर्गपुष्पें पूजन होत । परी पूजक न दिसे नृपाप्रत । म्हणोनि स्वगुरुसी तो भेटला ॥१३॥विनयपूर्वक विचारित । देवदर्शना उत्सुकचित्त । कृतांजलि तो वीरभद्र म्हणत । स्वामी ऐका वृत्तान्त ॥१४॥या देवालयीं प्रतिरात्रीं येत । गजाननाचें पूजन करण्या समस्त । देवगण परि मज न दिसत । त्यासाठीं मीं काय करावें ॥१५॥शिवशर्मा गुरु तेव्हां सांगत । निर्माल्याचीं फुलें देवळांत । इतस्ततः आच्छादून निभृत त्या स्थानीं तूं रहावें ॥१६॥त्यायोगें देवांचें दर्शन । घडेल महिपाला तुज पावन । वीरभद्रें तें वचन ऐकून । तैसेंचि केलें श्रद्धेनें ॥१७॥इंद्रादिदेव रात्रीं येत । नकळत निर्मांल्यावरे पाय पडत । त्यायोगें ते पुण्यहीन होत । पूजा करुनि चालले ॥१८॥परे ते सुरेश्वर अतिवेगहीन । विचार करिती काय न्यून । गतिखंडन कां झालें म्हणून । देवेंद्र सारें त्या वेळीं ॥१९॥तेव्हां कारण ते उमजती । निर्माल्य पायदळीं तुडविला गती । तेणें रुद्ध झाली सांप्रती । आता काय करावें ॥२०॥त्या वेळीं राजा तेथ येत । देवासमीप पूजा करण्या उद्यत । निर्माल्य सारा भरुन टाकित । देवामुख्यांसी पाहिलें तें ॥२१॥त्या देवांस प्रणाम करित । महाभक्तीनें त्यांना स्तवित । ते प्रसन्न होऊन नृपाप्रत । शंभु आदिक देव म्हणती ॥२२॥राजा तूं स्वार्थभावानें केलेंस । दुःखद कर्म अतिनीरस । आतां देबांच्या गतिलाभस । उपाय आतां तूं करावा ॥२३॥तें ऐकून भयभीत । राजा स्वगुरुस वृत्त सांगत । प्रणिपात करुन विचारित । उपाय देवा गति लाभाया ॥२४॥गुरु शिवशर्मा त्यास बोधित । तेव्हां राजा ध्यात मनात । गजाननासी प्रार्थित । म्हणे देवा क्षमा करीं ॥२५॥तुझ्या पूजनें जें पुण्य प्राप्त । तें पुण्यपुण्य मीं तुज अर्पित । देवांसी स्वगति लाभ त्वरित । व्हावा ऐसें करावें ॥२६॥अगाध पुण्य येतां तें पुनः प्राप्त । देवा समस्ता गति अद्भुत । विष्णु आदि देव म्हणत । राजा आतां वर माग ॥२७॥आपुलें दर्शन व्यर्थ न जात । ऐसे शास्त्रवचन प्रख्यात । म्हणोनि पुरवी मनोवांछित । यांत संशय कांहीं नसे ॥२८॥महावीर हात जोडून प्रार्थित । ब्रह्मादि देवां विनीत । गणेशावरी दृढ भक्तीचे शाश्वत । जडो आपुल्या कृपेनें ॥२९॥तदनंतर ते देव विस्मित । ऐकून प्रार्थना अपूर्व देत । गजाननासी प्रार्थूंन वरदान पुनीत । दृढ भक्तीचे गजाननाच्या ॥३०॥ब्रह्मभूतप्रद भक्ति । दृढ जाहली नृपाच्या चित्तीं । देव समस्त स्वर्गीं जाती । नृप तेथेंचि राहिला ॥३१॥आपुल्या बालपुत्रास देत । राज्य आपुलें प्रधानासहित । नित्य गजाननासी भजत । अनन्यचित्तें सर्वभावें ॥३२॥अंतीं स्वानंदवासी होत । गणनायका नित्य पूजित । ऐसें हें निर्माल्य माहात्म्य अद्भुत । संक्षेपें तुज कथिले मीं ॥३३॥हें वाचितां वा ऐकतां । जनांसी लाभेल पुनीतता । भुक्तिमुक्तीचा लाभ तत्त्वता । होईल यांत न संशय ॥३४॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते गणेशनिर्माल्यमाहात्म्यवर्णनं नामैकोनपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP