मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ३९ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ३९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत लोभासुरब्रह्माण्डविजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढें सांगती । विष्णुदेव दुःखित चित्तीं । वैकुंठ लोक सोडून झटिती । शंभूस शरण तें गेला ॥१॥देवेंद्रासह कैलासी जात । शिवास नमस्कार करित । जनार्दनाची स्तुति करित । वृत्तान्त समस्त निवेदिली ॥२॥तो ऐकून विष्णूस म्हणत । शिव सांत्वनपर वचन मुदित । नाना दृष्टिन्त देऊन करित । समाधान विष्णुप्रमुखाचें ॥३॥शिव म्हणे विष्णो तूं जगदीश्वर । सर्वज्ञ अससी थोर । परी तपाचें पुण्य महा उग्र । त्या असुराचें हेंही सत्य ॥४॥त्या तपाच्या पुण्यानें पराजित । झालास तूं युद्धांत । लोभासुरा मिळालें फल उदात्त । त्याच्या उग्र तपश्चर्येचें ॥५॥तें फल भोगून मरेल । काळ येतो तो खळ । माझ्या समीप रहा तूं निश्चल । समस्त देवांसह सांप्रत ॥६॥माझ्या भक्तीनें युक्त । तो येथ ण येईल निश्चित । ऐसें वचन ऐकून वसत । कैलासीं विष्नू देवांसह ॥७॥इंद्रासनीं लोभासुर बैसत । त्यास दानवगण म्हणत । विप्रचित्ति आदी मोहयुक्त । लोभा महाभागा ऐक ॥८॥देवगणांसह निवसत । विष्णु कैलासावर निश्चिंत । जरी शंकर आपुलें इष्ट दैवत । आदरणीय पूजनीय ॥९॥परी तो शत्रूस आश्रय देत । विपक्षाचे रक्षण करित । म्हणोनि पाठवावा दूत । शंकराप्रती अविलंबे ॥१०॥शिव जरी देवपक्ष घेईल । तरी त्यासी जिंकूं आपण सबळ । शंभूनें वर् दिला तुम्हांसी एक वेळ । हेंही सत्य नसे नृपा ॥११॥कर्माधीन जग समस्त । कर्माचें फळ शंभु तुम्हां देत । हा उपकार अथवा शक्ति नसत । शंकराची दैत्येंद्रा ॥१२॥म्हणोनि संदेह आपुला सोडून । शंभूचा त्याग करुन । स्वकर्माचा आश्रय घेऊन । करी क्षेम तूं आपुलें ॥१३॥ऐसें बोलून दानव थांबती । लोभासुर विचार करी चित्तीं । नंतर कैलासावरी शंकराप्रती । गजासुरासी पाठवी तो ॥१४॥तो महादैत्य कैलासे जात । शंभूसी प्रणाम करुन म्हणत । लोभदैत्याचा संदेश सांगत । सामपूर्वक त्या समयीं ॥१५॥गजासुर म्हणे महादेवासी । प्रणाम मीं करितों तुजसी । ऐक हितकर माझ्या वचनासी । लोभासुरें मज पाठविलें ॥१६॥त्याचा संकल्प सुखप्रद । आतां ऐक तूं विशद । तूं साक्षात् ईश्वर पूर्णप्रद । आम्हांसी पूज्य निरंतर ॥१७॥देववर विष्णु तुज संन्निध सांप्रत । आला असे शरणार्थी विनीत । तो आमुचा शत्रू असत । त्याग त्यासी सदाशिवा ॥१८॥आम्हीं तुमचे परम भक्त । आमुचा प्रिय तो तुमचा अनुगृहीत । आमुचा शत्रु तो तुम्हांप्रत । शत्रूसमची असावा ॥१९॥हें परमादरें मानावें । अन्यथा संग्रामार्थ सज्ज राहावें । तुज जिंकू लीलया हें जाणावें । निःसंशय भविष्यवचन ॥२०॥जर स्वकर्मानें समर्थ अससी । तरी स्वर्गाचें राज्य भोगिसी । आम्हां भक्तियुक्तासी रक्षसी । तरी भोगशील ऐश्वर्य ॥२१॥त्या गजासुराचें ऐकून वचन । शंकर भोले निःश्वास सोडून । सामवचन हितकर क्रोध गिळून । गजासुरा ऐक आतां ॥२२॥त्या लोभासुरा सांग जाऊन । मी कैलास सोडून अन्यत्र जाईन । परी जनार्दन विष्णूस न सोडीन । यांत संशय कांही नसे ॥२३॥कर्मयोगें जर तूं समर्थ अससी । स्वर्गाचें राज्य तरी भोगिसी । सर्व चराचर स्वाधीन तुजसी । महिमा अपार असे तुझा ॥२४॥ऐसें सांगून त्या दूताप्रत । कैलास सोडून अन्यत्र जात । सुरगणासह विष्णुसमवेत । महावनांत पर्वतप्रांती ॥२५॥महेशान पर्वत गुहेंत राहत । पशुसम काळ घालवित । तिकडे गजासुर लोभासुर सभेंत । सांगे सकल वर्तमान ॥२६॥तो वृत्तान्त ऐकून मुदित । जाहला लोभासुर अत्यंत । सत्यलोकीं वैकुठांत । कैलासीं स्थापिले असुर त्यानें ॥२७॥नाना देवपदें असुरेंद्राप्रत । तो परमानंदे देत । इंद्रासन सोडून भूमीवरी जात । नंतर स्वपुरांत तो दानवेंद्र ॥२८॥असत् भोगपरायण वर्तत । स्त्रीमांसमदिरासक्त । धन्य आपणासी मानित । कृतकृत्य संपूर्ण ॥२९॥ब्रह्मांड माझ्या वश असत । माझ्यासम श्रेष्ठ कोण जगांत । मीच एक बळवंत बुद्धिमंत । परमश्रेष्ठ मी एकला ॥३०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि । श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाजनचरिते लोभासुर ब्रह्माण्डजयो नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP