मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ४ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत दशरथव्रतोपदेशः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्षासी । आतां पुरातन संवाद सांगेन तुजसी । ज्यांत दशरथ राजासी । वसिष्ठांनी उपदेश केला ॥१॥तो ऐकतां चतुर्थीचें महिमान । दशरथासी समजलें प्रसन्न । ब्रह्म पुत्रा तूही होशिल पावन । चतुर्थी माहात्म्य तें ऐकता ॥२॥महायश दशरथास नव्हतें संतान । वंध्यादोषानें मन त्याचें खिन्न । वसिष्ठांसी शरण जाऊन । प्रणाम करुनी विचारी तया ॥३॥महामुने पुत्रप्राप्ती होण्यासी । उपाय सांगावा मजसी । आपल्या विनम्र शिष्यासी । तारावें या भवसागरीं ॥४॥तें ऐकून वसिष्ठ सांगत । दशरथा, नृपोत्तमा स्वीकारी व्रत । कुलदेव गणेशाचे तूं भक्तियुक्त । तेणें मनोरथ सफल होईल ॥५॥वसिष्ठाचें वचन ऐकून । पुन्हा त्यासी प्रणाम करुन । दशरथ विचारी विनयसंपन्न । कोणतें हें व्रत सांगा ॥६॥गणेशाचें हें व्रत । पूर्वी कोणी केलें जगांत । त्यापासून सिद्धि काय मिळत । कोणत्या वेळीं हें करावें? ॥७॥कोणता पूजन विधि असत । तें सर्व विस्तारें सांगा मजप्रत । मी आपुल्या वचनांकित । करीन आज्ञेनुसार तुमच्या ॥८॥वसिष्ठ तेव्हां दशरथासी म्हणती । धन्य धन्य तुझी मती । गणेश व्रतावरी तुझी भक्ती । दाखविलीस यायोगें ॥९॥चतुर्थी तिथी प्रिय अत्यंत । नृपोत्तमा गणनाथाप्रत । शुक्ल कृष्ण नामें जगांत । सर्वसिद्धिप्रद सर्वदा ॥१०॥चंद्राचा उदय होत । तेव्हां जी कृष्णा चतुर्थी येत । ती संकटहारिणी विख्यात । चतुर्विध फलप्रद ॥११॥चतुर्विध हें जग समस्त । तेथ संकटें तैशीच येत । परी तीं सर्व दूर होऊन भोगित । इहलोकीं अखिल भोग ॥१२॥जरी चंद्रोदयी चतुर्थी न लागत । तरी प्रदोष व्यापिनी ग्राहय होत । सर्व संकटांपासून मुक्त । हे व्रत करिता भक्त होय ॥१३॥जरी उभय दिनीं चतुर्थी असत । तरी चंद्र संयुक्त आचरावी उपवासयुक्त । स्वेच्छाविहारें करिती भक्त । ऐसा क्रम कथिला असे ॥१४॥तृतीयेस प्रदोष असत । त्या रात्रीं चंद्रोदया चतुर्थी येत । तरी तीच ग्राहय सदा होत । अन्य दिवस सोडोनिया ॥१५॥शुक्ल कृष्ण चतुर्थीत । शुक्ला वरदा नामें ख्यात । व्रतकारी जनासी लाभत । संचित असंचित सर्व लाभ ॥१६॥धर्म अर्थ काम मोक्ष हे चार । पुरुषार्थ प्राप्त करी नर । गणेशासी प्रीतिकर । म्हणोनि ही वरदा चतुर्थी ॥१७॥मध्याहनव्यापिनी ग्राह्य होत । शुक्ल चतुर्थी ऐसा संकेत । उभयत्र जेव्हां लाभत । तेव्हां प्रहर भानुगा उपासावी ॥१८॥एक प्रहरानंतर होत । जरी तृतीया सूर्य संयुत । तरी पूर्वा असो परा वा उभयतांत । व्रतसंमत चतुर्थी ती मान्य असे ॥१९॥जो असे चतुर्थी व्रतहीन । त्याची अन्य समस्त व्रतें फलहीन । म्हणोनि निष्ठा ठेवून । चतुर्थी व्रत आचरावें ॥२०॥हें व्रत महाभागा आचरिलें । ब्रह्मदेवानें पूर्वी भलें । या व्रताच्या प्रभावे निर्मिलें । सकळ जग विधात्यानें ॥२१॥ऐसें हें उत्तम व्रत । विष्णु शंकरही आचरित । त्यायोगें स्थिति संहार करित । अनुक्रमें ते दोघे ॥२२॥शुक मुख्य कश्यपादि मुनीश्वर । ऐसे योगीजन उदार । चतुर्थीचे हें व्रत पवित्र । स्वकार्यसिद्धिस्तव करिती ॥२३॥इहलोकीं अखिल भोग भोगून । अंतीं स्वानंदलोकी करिती गमन । अन्य ऐसे पुरुषार्थ साधन । चतुर्थीसम जगांत नसे ॥२४॥वर्णाश्रमसंस्थित अन्य नारी नर बहुत । जे चतुर्थीचें व्रत आचरित । ते ते सर्व ब्रह्मभूत । होऊन पावले स्वानंदपुरासी ॥२५॥ऐसे हें व्रत भावसंयुक्त । दशरथा करी तूम एकचित्त । तरी पुत्रलाभ होऊन निश्चित । स्वानंदलोकी जाशील ॥२६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते दशरथव्रतोपदेशो नाम चतुर्थोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP