मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ३४ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ३४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत वसिष्ठदशरथसंवादसमाप्तिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रावणमासीं लाडु आदि भक्षित । जो ब्राह्मण विधियुक्त । त्या व्रताचें माहात्म्य मजप्रत । सांगावें कृपा करुन ॥१॥ऐसें दशरथ राजा प्रार्थित । तेव्हां वसिष्ठ त्यास सांगत । वैवस्वतमनूचा एक सुत । इक्ष्वाकु नामा कनिष्ठ ॥२॥तो राज्य लोभी व्रत करित । भक्षण करी श्रावण महिन्यांत । संकष्टी व्रताच्या आचरणांत । पंचखाद्यांचे लाडू तेव्हां ॥३॥सप्तभावें साधनतत्पर । दही खाऊन राही भक्तिपर । भाद्र्पद कृष्ण चतुर्थीस तो उदार । आश्विनी संकष्टी निर्जला करी ॥४॥कार्तिकांत केवळ दुग्धसेवन । राजा पाळी तो नियम प्रसन्न । मार्गशीर्षांत जल पिऊन । संकष्टी व्रत करीतसे ॥५॥पौषमासांत गोमूत्र प्राशन । माघांत पांढरे तीळ सेवन । फाल्गुनांत शर्करायुक्त भक्षण । घृताचें करी व्रतकारणें ॥६॥चैत्रांत पंचगव्याचें प्राशन । करी तो विनायकाचें पूजन । वैशाखांत कमलबीज खाऊन । व्रत पालन तो करीतसे ॥७॥ज्येष्ठांत गाईचें तूप खाई । व्रत उत्तम पूर्णत्वा नेई । आषाढांत मध भक्षून राही । गणेशास पुजून चंद्रोदयीं ॥८॥नंतर त्या व्रताच्या प्रभावें होत । सुद्युम्न मनपुत्र ज्येष्ठ जगांत । इलास त्या आद्य मुनि करित । राजा आपुला आदरयुक्त ॥९॥मनु इक्ष्वाकु ऐशापरी होत । सार्वभौम महाद्युती पुनीत । असाध्य जरी मानव इच्छित । तरी तेंही प्राप्त । धर्म मार्गानें ॥१०॥ऐशापरी नानाजन । व्रतपुण्यें झाले पावन । ब्रह्मभूत ते होऊन । शोभले या भूमंडळीं ॥११॥म्हणोनि राजशार्दूला तूं सांप्रत । पापरुपा मज वाटत । चतुर्थींचे नष्ट व्रत । तुझिया राज्यीं परी न जाणसी ॥१२॥प्रजाजनांसमवेत । जर करशील तूं हें व्रत । होऊनियां पुत्रवंत । अंतीं विघ्नेशसरुपता ॥१३॥मुद्गल म्हणती दक्षाप्रत । ऐसें ऐकून वसिष्ठवचन यथायुक्त । दशरथ महाराजा प्रणाम करित । वसिष्ठांसी आदरें ॥१४॥नंतर स्वपुरीं परतत । प्रजेसह व्रत आचरित । दवंडी करी स्वराज्यांत । म्हणे करा हें व्रत देवाचें ॥१५॥त्या राजाज्ञेचें करिती पालन । व्रत हें संकष्टीचें पाळून । व्रतपुण्यप्रभावें सुजाण । साक्षात् विष्णु तो झाला ॥१६॥त्याचे चार पुत्र प्रख्यात । राम लक्ष्मण भरत ज्ञात । शत्रुघ्न चवथा असत । बलसंयुत सर्वही ते ॥१७॥दशरथ अंतीं विघ्नेशाप्रत । व्रत पुण्याईनें जात । लोक झाले दुःखरहित । ब्रह्मभूत झाले सर्वही ॥१८॥वसिष्ठ दशरथांचा हा संवाद । व्रतहेतुक जो ऐकेल सुखद । अथवा वाचील पुण्यप्रद । विघ्नेश्वर त्यास देई फल ॥१९॥पुत्रपौत्रादिक धनधान्य संपत्ती । देई त्यासी गणपति । नाना रोगांतून मुक्ती । ऐश्वर्यही समग्र लाभे ॥२०॥अंती गणपतींत लीन । होतो भक्त तो महान । यांत संशय नसे पावन । संपूर्ण हें कथानक ॥२१॥चतुर्थ्यांचा वृत्तान्त । महिम्यासह कथिला तुजप्रत । आतां आणखी काय ऐकण्या चित्त । इच्छित तुझें तें सांग ॥२२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गलें महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते वसिष्ठशरथसंवादसमाप्तिवर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP