मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
सप्रदानीय

सूत्रस्थान - सप्रदानीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय ३

आता " अध्याय सप्रदानीय " नांवाचा अध्याय सांगतो . जसे धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१॥२॥

मागे पहिल्या अध्यायात सांगितले आहेच की , पहिल्या पाच स्थानामध्ये एकशेवीस अध्याय आहेत . त्यात पहिल्या सूत्रस्थानात सेहेचाळीस अध्याय आहेत . निदानस्थानाचे अध्याय सोळा आहेत . तिसर्‍या शारीरस्थानात दहा अध्याय सांगितले आहेत . चवथ्या चिकित्सास्थानाचे अध्याय चाळीस आहेत पाचव्या कल्पस्थानाचे अध्याय आठ मिळून एकशेवीस अध्याय आणि शेवटच्या सहाव्या उत्तरतंत्राचे ( स्थानाचे ) अध्याय सहाषष्ट मिळून ह्या ग्रंथाचे एकदंर एकशेश्याऐशी अध्याय आहेत ॥३॥

त्यांत " वेदोत्पत्ति " नांवाचा पहिला अध्याय , दुसरा " शिष्योपनयन ", तिसरा " अध्ययन संप्रदायीन ", चौथा " प्रभापणीय " पांचवा " अग्नोपहरणीय ", सहावा " ऋतुचर्या ", सातवा " मंत्रविधि " आठवा " शस्स्त्रावचारणीय " , नववा " योग्यासूत्रीय ", दहावा " विशिखानुप्रवेशनीय ", अकरावा " क्षारपाकविधि ", बारावा " अग्निकर्मविधि ", तेरावा " जलौकावचारणीय ", चौदावा " शोणीतवर्णनीय ", पंधरावा " दोषधातुमलक्षय वृद्धिविज्ञानीय ", सोळावा " कर्णव्यधबंधनविधि " , एकोणिसावा " व्रणितोपासनीय ", विसावा " हिताहितीय ", एकविसावा " व्रणप्रश्नाध्याय ", बाविसावा " व्रणस्त्रावविज्ञानीय ", तेविसावा " कृत्याकृत्यविधि ", चोविसावा " व्याधिसमुद्देशीय ", पंचविसावा " शस्त्रविद्या विनिश्रय ", ( किंवा " अष्टविधशस्त्रकर्म " ), सविस्सावा " प्रनष्टशल्य विज्ञानीय ", सत्ताविसावा " शल्योद्धरणीय ", ( शल्यापनयनीय ), अठ्ठाविसावा " विपरीताविपरीतव्रणविज्ञानीय ", एकोणतिसावा " विपरीताविपरीत दूत शकुन स्वप्न निदर्शनीय " , तिसावा " पंचेद्रियार्थ विप्रतिपत्ति अध्याय , " एकतिसावा " छायाविप्रतिपत्ती अद्याय ", बत्तिसावा " अवारणीय " ( किंवा " व्याध्यवारणीय " ), चौतिसावा " युक्तसेनीय , " पस्तिसावा " आतुरापक्रमणीय ", छत्तीसावा " मिश्रकाघ्याय ", सदतिसावा " भूमिप्रभागविज्ञानीय " , अडतिसावा " द्रव्यसंग्रहणीय ", एकूणचाळीसावा " संशोधन संशमनीय " , चाळिसावा " द्रव्य - रसगुणवीर्यविपाकविज्ञानीय , " एकेचाळीसावा " द्रव्यविशेष विज्ञानीय ", बेचाळिसावा " रसविशेष विज्ञानीय ," त्रेचाळिसावा " वमन द्रव्य - विकल्प - विज्ञानीय , " चव्वेचाळिसावा " विरेचनद्रव्य विकल्प विज्ञानीय ", पंचेचाळीसावा " द्रवद्रव्यविधि , " आणि सेहेचाळीसावा " अन्नपानविधि . " ह्याप्रमाणे हे सेहेचाळीस अध्याय ह्या सूत्रस्थानांत सांगितले आहेत . शास्त्रासंबंधाच्या विशेष लक्षात ठेवण्याच्या गोष्टीसंबंधी सूचना , शास्त्राची परिभाषा , पंचकर्मादिकासंबंधी व तसेच अन्नपानादि इतर विषयासंबंधी वगैरे सर्व माहिती संगतवार ह्या सूत्रस्थानात सांगितली आहे . वैद्यक्रियेला लागणारी सर्व सामुग्री व तयारी ही सर्व माहिती ह्या स्थानांत सूत्रित ( ग्रथित ) एकत्र केली आहे , म्हणून ह्या स्थानाला सूत्रस्थान असे म्हटले आहे ॥४॥१२॥

दुसर्‍या निदानावस्थेमध्ये पहिला अध्याय " वातव्याधिनिदान , " दुसरा " अर्शनिदान , " तिसरा " अश्मरीनिदान , " चौथा " भगंदर निदान , " पाचवा " कुष्ठनिदान , " सहावा " प्रमेह ( मधुमेह ) निदान , " सातवा " उदरनिदान , " आठवा " मूढगर्भनिदान , " नववा " विद्रधिनिदान , " दहावा " विसर्पनाडीव्रणस्तनरोगनिदान , " अकरावा " ग्रंथी , अपचि , अर्बुच , गलगंडनिदान , " बारावा " वृद्धि ( वृषणवृद्धी ), उपदंश , श्लीपदनिदान , " तेरावा " क्षुद्ररोगनिदान , " चौदावा " शुक्रदोषनिदान , " पंधरावा " भग्ननिदान , " आणि सोळावा " मुखरोगनिदान ह्याप्रमाणे हे सोळा अध्याय ह्या निदानस्थानांत सांगितले आहेत . रोगांची कारणे व लक्षणे इत्यादि माहिती ह्याला निदानस्थान म्हटले आहे ॥१३॥१४॥

तिसरे शारीरस्थान . ह्या स्थानांतील पहिला अध्याय " सर्वभूतचिंता शारीर , " दुसरा " रजःशुद्धी " किंवा " शुक्रशोणीत शुद्धी शारीर , " तिसरा गर्भावक्रांतिशारीर , " चवथा " गर्भव्याकरणशारीर " पांचवा " शरीरसंस्था व्याकरणशारीर , " सहावा " प्रत्येक मर्म निर्देशशारीर , " सातवा शिरा वर्णन विभक्तिशारीर , " आठवा " शिराव्यधविधिशारीर , " नववा " धमनीव्याकरणशारीर " आणि दहावा अध्याय " गर्भिणी व्याकरणशारीर " असे हे शारीरस्थानाचे दहा अध्याय महर्षि दिवोदास ह्यांनी वैद्य व योग्याभ्यासी ह्यांना शरीरावयांची चांगली माहिती व्हावी ह्या हेतूने सांगितले आहेत ॥१५॥१७॥

चवथे चिकित्सास्थान . ह्या स्थानाचे एकंदर चाळीस अध्याय आहेत . त्यांपैकी पहिला अध्याय " द्विव्रणीय चिकित्सा , " दुसरा सद्योव्रणचिकित्सा , " तिसरा " भग्ननांचिकित्सा , " चवथा " वातव्याधिचिकित्सा , " पांचवा " महावात व्याधिचिकित्सा , " सहावा " अर्शसांचिकित्सा , " सातवा " अश्मरीचिकित्सा , " आठवा " भगंदरचिकित्सा , " नववा कुष्ठचिकित्सा , " दहावा महाकुष्ठचिकित्सा ," अकरावा " प्रमेहचिकित्सा , " बारावा " प्रमेहपीडकाचिकित्सा ," तेरावा " मधुमेहचिकित्सा , चवदावा " उदरचिकित्सा , " पंधरावा " मूढगर्भचिकित्सा , " सोळावा " विद्रधिचिकित्सा ," सतरावा " विसर्पचिकित्सा , " अठरावा " ग्रंथिअर्बुदगलगंडचिकित्सा , " एकोणिसावा " वृद्धि , उपदेश , श्लीपदचिकित्सा , " विसावा " क्षुद्ररोगचिकित्सा , " एकविसावा " शूकदोषचिकित्सा , " बाविसावा " मुखरोगचिकित्सा , " तेविसावा " शोथचिकित्सा , " चोविसावा " अनागतबाध प्रतिषेध - चिकित्सा ," पंचविसावा " मिश्रचिकित्सा , " सव्विसावा " क्षीणबलीयवाजीकरणचिकित्सा ," सत्ताविसावा " सर्वबाधशमन ( सर्वोपघातशमनीयरसायन ) चिकित्सा ," अठ्ठाविसावा " मेधायुष्कामीय रसायन " एकोणतिसावा , " स्वभावव्याधिप्रतिषेधनीयंरसायनचिकित्सा ," तिसावा " निवृत्तिसंतापीयरसायनचिकित्सा ," एकतिसावा " स्नेहोपयोगिकचिकित्सा ," बत्तिसावा " स्वेदावचारणीयचिकित्सा , " तेहेतिसावा " वमन विरेचन - साध्योपद्रवचिकित्सा , " चौतिसावा " वमन - विरेचन - व्यापच्चिकित्सा , " पस्तिसावा " नेत्रबस्तिप्रमाण - प्रविभागचिकित्सा , " छत्तिसावा " नेत्रबस्तिव्यापच्चिकित्सा , " सदतिसावा " अनुवासनोत्तरबस्तिचिकित्सा , " अडतिसावा " निरुहोपक्रमचिकित्सा , " एकूणचाळिसावा " आनुरोपद्रव चिकित्सा " आणि " चाळिसावा धूम - नस्य - कवल - ग्रहादिचिकित्सा " ह्याप्रमाणे ह्या स्थानांत प्रायश्चित , प्रशमनोपाय , चिकित्सा , ( उपचार ) शांतीकर्म , आणि त्यांचे पर्याय सांगितले आहेत , म्हणून ह्या स्थानाला " चिकित्सास्थान " हे नांव आहे ॥१८॥२६॥

पांचवे कल्पस्थान . ह्याचे एकंदर आठ अध्याय आहेत . त्यांपैकी पहिला अध्याय " अन्नपानरक्षाकल्प , " दुसरा " स्थावरविषविज्ञानीय , " तिसरा " जंगमविषविज्ञानीय , " चवथा " सर्पदष्टविषविज्ञानीय , " पाचवा " सर्पदष्टविषचिकित्साकल्प , " सहावा " मूषीककल्प , " सातवा " दुंदुभि - रवनीयकल्प " आणि आठवा " कीटककल्प , " ह्याप्रमाणे ह्या कल्पस्थानांत आठ अध्याय सांगितले आहेत . ह्या स्थानांत विशेषतः विषबाधेवरील निरनिराळे औषधीकल्प सांगितले आहेत . ह्याप्रमाणे ह्या पांच स्थानांत मिळून एकशेवीस अध्याय सांगितले . ह्यापुढे सहावे उत्तरतंत्र , त्याचा अध्यायानुक्रम सांगतो . ॥२७॥२९॥

शस्त्रचिकित्सेने जे साध्य रोग त्यांचे निदान व चिकित्सा मागे त्या त्या स्थानांत सांगितली . आतां शल्यचिकित्सेशिवाय ( शस्त्रक्रियेशिवाय ) बाकीची जी अंगे त्यासंबंधी जे रोग ते औपद्रवीक म्हणून मुख्यतः कल्पून त्यांची निदानासह चिकित्सा ह्या स्थानांत सांगितली आहे . म्हणून ह्या स्थानांतील जो पहिला अध्याय त्याला " औपद्रविक अध्याय " म्हटले आहे . ह्याचा दुसरा अध्याय " संधीगतरोग विज्ञानीय , " तिसरा " वर्त्मगतरोग विज्ञानीय , " चवथा " शुक्लगतरोग विज्ञानीय , " पांचवा कृष्णगतरोग विज्ञानीय , " सहावा " सर्वांगतरोग विज्ञानीय , " सातवा " दुष्टिगतरोग विज्ञानीय , " आठवा " चिकित्साप्रविभाग विज्ञानीय , " नववा " वाताभिप्यंद प्रतिषेध , " दहावा " पित्ताभिष्यंद प्रतिषेध , " अकरावा " श्लेष्माभिष्यंद प्रतिषेध , " बारावा " रक्ताभिष्यंद प्रतिशेध , " तेरावा " लेख्य रोग प्रतिषेध , " चौदावा " भेद्यरोग प्रतिषेध , " पंधरावा " छेद्यरोग प्रतिषेध , " सोळावा " वर्त्मरोग प्रतिषेध , " ( पक्ष्यरोग प्रतिषेध ), सतरावा " दुष्टिगतरोग प्रतिषेध , " अठरावा " क्रियाकल्पाध्याय , " एकोणिसावा " नयनाभिदान प्रतिषेध , " विसावा " कर्णगतरोग विज्ञानीय , " एकविसावा " कर्णगतरोग प्रतिषेधाय , " बाविसावा " नासारोग " विज्ञानीय , " तेविसावा " नासारोग प्रतिषेधीय , " चोविसावा ’ प्रतिश्याय प्रतिषेध , " पंचविसावा " शिरोरोग विज्ञानीय , सव्विसावा " शिरारोगे प्रतिषेध , " ह्या ठिकाणी शालक्यतंत्रासंबंधी प्रकरण संपले . सत्ताविसावा " नवग्रहाकृति विज्ञानीय , " अठ्ठाविसावा , " स्कंदग्रह प्रतिषेध , " एकोणतिसावा " स्कंदापस्मार प्रतिषेध , तिसावा " शकुनीग्रह प्रतिषेध , " एकतिसावा " रेवतीग्रह प्रतिषेध , " बत्तिसावा " पूतना प्रतिषेध , " तेहेतिसावा " अंधपूतना प्रतिषेध , " चौतिसावा " शीतपूतना प्रतिषेध , " पस्तीसावा " मुखमंडिका प्रतिषेध , " छत्तिसावा " नैगमेयग्रह प्रतिषेध , " सदतिसावा " ग्रहोत्पत्ति , " अडतिसावा " योनिव्यापत्प्रतिषेध , " इथपर्यंत हे कुमारतंत्र सांगितले . याखेरीज विशेष माहिती शारीरस्थानांत सांगितली आहेच . एकूणचाळिसावा " ज्वर प्रतिषेध , " चाळीसावा " अतिसार प्रतिषेध , " एकेचाळिसावा " शोष प्रतिषेध , " बेचाळिसावा " गुल्म प्रतिषेध , " त्रेचाळिसावा " हृद्रोग प्रतिषेध , " चव्वेचाळिसावा " पांडुरोग प्रतिषेध , " पंचेचाळिसावा " रक्तपित्त प्रतिषेध , " सेहेचाळिसावा " मूर्च्छारोग प्रतिषेध , " सत्तेचाळिसावा " पानात्यय प्रतिषेध , " अठेठेचाळीसावा " तृष्णा प्रतिषेध , " एकूणपन्नासावा " छर्दि प्रतिषेध , " पन्नासावा " हिक्का प्रतिषेध , " एक्कावन्नावा " श्वासप्रतिनिषेध , " बावन्नावा " कास प्रतिषेध , " त्रेपन्नावा " स्वरभेद प्रतिषेध , " चौपन्नावा " कृमिरोग प्रतिषेध , " पंचावन्नावा " उदावर्त प्रतिषेध , " छपन्नावा , " विसूचिका प्रतिषेध , " सत्तावन्नावा " आरोचक प्रतिषेध , " अठ्ठावन्नावा " मूत्राघात प्रतिषेध , " एकूणसाठावा , " मूत्रकृच्छ्र प्रतिषेध , " ( मूत्रदोष प्रतिषेध ), " हे कायचिकित्सेपैकी शेष राहिलेले प्रकरण सांगितले . साठावा " अमानुष प्रतिषेध , " एकसष्ठावा " अपस्मार प्रतिषेध , " हे तीन अध्याय भूतविद्येसंबंधी सांगितले आहेत . हे उत्तर तंत्रच सर्वात श्रेष्ठ झाले आहे असे मोठमोठ्या ऋषींनी म्हटले आहे . आयुर्वेदामागाहून केले असल्यामुळे ह्याला उत्तरतंत्र म्हटले आहे ॥३०॥४३॥

ह्या उत्तरतंत्रांत शालाक्वतंत्र , कौमारभृत्यतंत्र , कायचिकित्सा व भूतविद्या ह्या आयुर्वेदाच्या चार अंगांची माहिती दिली आहे . वाजीकरणप्रकरण व रसायनचिकित्सा ह्या दोन अंगांची माहिती चिकित्सास्थानांत दिली आहे . विषतंत्र व त्यासंबंधी औषधीकल्प ह्यांची माहिती कल्पस्थानांत दिली आहे आणि शल्यचिकित्सेची माहिती तर मुख्यत्वाने ह्या ग्रंथांत सर्वत्र आहेच . ह्याप्रमाणे हे आयुर्वेदाच्या आठही अंगांच्या माहितीने पूर्ण असे शास्त्र आदिदेव धन्वंतरी ( दिवोदास ) ह्यांनी लोकहितार्थ प्रगट केले आहे . ह्या शास्त्राचे विधियुक्त अध्ययन करुन औषधी योजना करणारा वैद्य ह्या जगांत मनुष्याला प्राणदांन देण्यास समर्थ होईल ॥४४॥४६॥

ह्या शास्त्राचे अवश्य अध्ययन करावे आणि अध्ययन झाल्यावर त्याप्रमाणे हातून क्रियाही पूर्ण अनुभवून घ्यावी . अशा प्रकारे शास्त्र व क्रिया ह्या दोन्हीमध्ये कुशल असलेला वैद्य राजसन्माला योग्य असा होतो .

ह्याबद्दल असे म्हटले आहे की , जो केवळ शास्त्राच्या ज्ञानांत कुशल पण त्याच्या हातून प्रत्यक्ष क्रिया झालेली नाही , असा वैद्य उपचार करण्याकरिता रोग्याकडे गेला असता जसा भित्रा मनुष्य युद्धात गेला असता घाबरतो त्याप्रमाणे घाबरतो , त्यामुळे त्याला काय करावे ते सुचत नाही , तसेच वैद्याच्या हाताखाली वागल्याने ज्याला औषधोपचाराची किंवा शस्त्रक्रियेची सर्व कामे हातून गेल्यामुळे केवळ क्रिया मात्र माहित असतेः पण त्याने शास्त्राचे अध्ययन केलेले नसते . अशा मनुष्याने जर धाडसाने वैद्यकिचा धंदा आरंभिला तर त्याला थोर लोकांत मान मिळत नाहीच , पण त्याच्या हातून प्रमाद झाला तर तो राजशासनाला व प्रसंगविशेषी वधासही पात्र होतो . असे दोनही प्रकारचे हे वैद्य अर्धवट ज्ञानाचे असल्यामुळे वैद्यकीया करण्यास नालायक ठरतात , हे दोघेही अर्धवट ज्ञानाचे असल्यामुळे एकच पंख असलेल्या पक्ष्याप्रमाणे निरुपयोगी असतात . अशा प्रकारच्या वैद्यापासून औषधोपचार किंवा शस्त्रकर्म केले असता शस्त्र हे वज्राप्रमाणे व औषध हे अमृताप्रमाणे गुणकारक असले तरी ते विषाप्रमाणे प्राणनाशक होते म्हणून अशा वैद्यांकडून औषधोपचार करुन घेऊ नये .

शस्त्रकर्माचे ज्ञान ज्याला नाही , तसेच स्नेहनस्वेदनादि पंचकर्माची ज्याला यथायोग्य माहिती नाही अशा प्रकारच्या अडाणी वैद्याला वैद्यकीचा धंदा करण्याविषयी जर राजाने कायद्याने बंदी केली नाही तर तो वैद्य व्यलोभाने मनुष्याचा प्राणघातही करील .

जो बुद्धिवान वैद्य शास्त्र व क्रिया या दोनही गोष्टीत निपुण असतो तो आपल्या कार्यसाधनाला समर्थ असतो . ज्याप्रमाणे दोन चाके असलेला रथ युद्धामध्ये काम करण्यास समर्थ असतो त्याप्रमाणे हा आपले कार्यात व रोग्यास आरोग्य देण्यास समर्थ असतो ॥४७॥५३॥

आतां शिष्योत्तमा सुश्रुता , ह्या शास्त्राचे अध्ययन कसे करावे ते मी सांगतो . ते तू लक्षांत ठेव .

स्नान करुन शुचिर्भूत झालेला , वस्त्रपरिधान केलेला , सुप्रसन्न मनोवृत्ती आहेत , असा विध्यार्थी शिकण्याच्या हेतूने आला असतां त्याला अध्ययनाच्या वेळी गुरुने त्याच्या ग्राहक शक्तीच्या मानाने श्लोकाचे एक पद , पाद ( चतुर्थांश ) अथवा संपूर्ण श्लोक पाठ करण्यास सांगावा विध्यार्थ्याने ते पद , पाद , श्लोकादि पुनः पुनः क्रमाने शंका वगैरे विचारुन चांगले समजून घ्यावे . ह्याप्रमाणे एक एक श्लोक ( उतारे ) आपण स्वतः घोकून पाठ करावा .

पाठ करतांना अतिशय घाई करु नये , अति सावकाश किंवा रेंगाळत म्हणू नये , साशंकवृत्तीने पाठ करुं नये , अनुनासिक किंवा निरनुनासिक शब्दांकडे नीट लक्ष द्यावे . पाठ करतांना शब्दांचा किंवा अक्षरांचा उच्चार स्पष्ट करावा . वर्णाचा उच्चार अतिशय जोराने किंवा कष्टाने करु नये . भुंवया , ओठ व हात इत्यादिकांनी कसलेही अभिनय ( चलन व्यापार - निष्कारण हालचाल ) करु नयेत . चांगले शुद्ध म्हणावे . अति उंच स्वराने किंवा फार हळू अशा स्वराने अध्ययन करु नये . अध्ययन चालू असता ( शिक्षण सुरु असता ) गुरु व विद्यार्थी ह्या उभयतांच्या मधून कोणी जाऊ नये ॥५४॥

ह्या संबंधाने दोन श्लोकांत असे म्हटले आहे -

पवित्र आचरण करणारा , गुरुच्या सेवेत तत्पर , आपल्या कामात दक्ष , तंद्रा ( आळस ) व झोप फा न घेणारा , अशा विद्यार्थ्याने वर सांगितलेल्या विधीने पठण करावे . म्हणजे त्याच्या हातून संपूर्ण शास्त्राचे अध्ययन होते .

भाषापटुत्व , ( बोलण्यांत कुशलपणा ), अर्थज्ञान , प्रौढपणा , हस्तक्रियेत कुशलपणा ह्या गोष्टींचा नित्य अभ्यास देऊन त्यांत पारंगत होण्याविषयी अध्ययन संपेपर्यंत सारखा प्रयत्न चालू ठेवावा ॥५५॥५६॥

अध्याय तिसरा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP