मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन

श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तुम्हां सकळांसी माझा नमस्कार । तुम्ही परमेश्वर गुरुभक्त ॥१॥
थोर आजवरी तुम्ही कृपा केली । मजवरी भली प्रेमभरे ॥२॥
साह्य मज केले भजन चालविले । अन्याय घातले पोटी माझे ॥३॥
उत्कर्ष व्रताचा येथे तुम्ही केला । श्रीगुरुकार्याला संपादिले ॥४॥
तुम्ही आईबाप तुम्ही बहिणभाऊ । उपमा काय देऊं तुम्हांलागी ॥५॥
तुम्ही माझे जाणा सखे की सोयरे । कृपाच उदारे तुम्ही केली ॥६॥
म्हणोनीच झाला भजन समारंभ । येथे पद्मनाभ प्रकटला ॥७॥
म्हणोनी चरणी मस्तक ठेवितो । निरोप मागतो तुम्हांपाशी ॥८॥
गुरु मज नेती आपुल्या कार्याला । माझीये भाग्याला वाढवाया ॥९॥
गुरुकृपेचा मी असे की बालक । जननीजनक गुरु माझे ॥१०॥
तयांसवे जातो तुम्हांसी वंदितो । क्षमा मी मागतो तुमची की ॥११॥
विनायक म्हणे तुंमचा लडिवाळ । असे जाणा बाळ लाडका मी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP