मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| देवलीलांचे अगम्यत्व श्रीदत्त भजन गाथा गणेश जयंती शिवरात्र राम नवमी हनुमान जयंती. नृसिंह जयंती वासुदेव-जयंती कृष्णजयंती वराह जयंती वामन जयंती देवी चरित्र गुरुद्वादशी भाऊबीज सप्ताह-अनुष्ठान उत्सवाची मागणी उत्सव चंपाषष्ठी वासुदेव चरित्रसार दर्शनसुख अहं दत्तोऽस्मि ईशप्रसाद लक्षणें स्वरुपवर्णन दर्शनलालसा क्रीडा लालसा दत्तदासांची श्रीमंती दत्तभक्ताची स्थिति वासुदेव चरित्र सार वासुदेवाचा धांवा श्राद्धविधी उत्तरगति कोजागरी योग्याची लक्षणे नरकासुर वध श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध स्वरुपवर्णन सदा वस देवा ठायी योगाभ्यास विष्णुप्रबोध सह्यवनश्री व देवांचा विलास विरक्तीची व्याख्या कृतज्ञता वचन प्रार्थना स्वरुपवर्णन भजनछंद गजेंद्र मोक्ष ये यथा मां प्रपद्यन्ते ईश्वरावर निस्सीम निष्ठा दर्शन लालसा सत्यापरता नाही धर्म नृसिंह्सरस्वती प्रयाण भिल्लीणी आख्यान कृतज्ञता वचन ईश्वराचे विनायकास सहाय्य गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग दत्तमयत्रिभुवन तमाशा ईश्वर आणि भक्त विनायकाचा संकल्प भक्ताभिमानी देव भीष्म प्रतिज्ञा ईश्वराची भक्तांशी ऐक्यता ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना विश्वामित्र मख रक्षण भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती देवकार्यासाठी धैर्य पाहिजे देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत कनवाळू देव कनवाळू देव दृष्टांत प्रभुवात्सल्य परमेश्वराची शब्दातीतता शबरी आख्यान ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला दत्त भार्गव भेट दत्त तादात्म्य देव आणि भक्त यांचा रंग देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति वसंतश्री देवांचा वसंत महोत्सव रमामाधव योग गंगावतरण शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ? गंगावतरण एको रस: करुण एव देवलीलांचे अगम्यत्व व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा ) वासुदेव चरित्र सार विनायकाचे कोडे दु:ख स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह: गुरु माउली कृपाळू वासुदेव "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ईशसेवनासक्ती जगत्पिता पितृत्वाचे कारण अन्न उपासनामहती योगाचा दुरुपयोग कर्माने मोक्ष मिळत नाही शुंभ-निशुंभ कथा स्खलनशीलता मन हे ओढाळ गुरुं देहप्रमाद उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर भगवंतास स्वार्पण भक्तत्राता परमेश्वर ’अहं दत्तोऽस्मि’ बालस्वरुप वर्णन भक्त आणि देव यांची एकरुपता आज्ञा विनायकाचा अनुभव विनायकाची गुरुमयता श्रीगुरुंचा आशीर्वाद श्रीगुरुंचा निरोप श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन प्रस्थानकाळी आज्ञा मागणी श्रीदत्त भजन गाथा - देवलीलांचे अगम्यत्व श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन देवलीलांचे अगम्यत्व Translation - भाषांतर गुरुवार ता. ३-७-१९३०लीला तुझी देवा आम्हां न समजे । मति न उपजे कांही जाणे ॥१॥कितीतरी वेळां आम्हां वांचविसी । आश्चर्य दाविसी परोपरी ॥२॥कितीतरी वेळां संकटांत उडी । घालिसी तांतडी जगन्नाथा ॥३॥न घडणारे जे का, तेच घडवीसी । आपुला दाविसी साक्षात्कार ॥४॥ऐसे महिमान दाविसी कांही वेळां । विपरीत स्नेहाळा कधीं दाविसी ॥५॥किती जरी आम्ही रडलो तुजपुढे । सांगितले गाढे मनोगत ॥६॥किती जरी देवा लोळण घेतली । किती स्तुति केली तुझी जरी ॥७॥तरी कांही वेळां मुळीं न हालसी । कठोरता दाविसी आम्हांलागी ॥८॥होसी तेव्हा देवा व्रजाहुनी कठीण । तुझे अंत:करण द्रवेनाच ॥९॥ऐसे किती वेळां तरी तूं दाविसी । या तव लीलांसी कोण जाणे ॥१०॥कांहीच कळेना तुझिया मनिचे । तेथे आम्ही साचे बापुडे की ॥११॥आम्ही तुज प्रिय अथवा अप्रिय । यांतील गुरुराय कांही न कळे ॥१२॥अप्रिय म्हणावे उडी घालितोसी । दु:खे निवारीसी दयाघना ॥१३॥प्रिय जरी तुज आपणां गणावे । विपरीत यावे अनुभवा ॥१४॥नसतींच येती संकटे आम्हांसी । न केलीच आंगासी पापे येती ॥१५॥काय म्हणो तरी समजेना कांही । गोंधळलो पाही गुरुनाथा ॥१६॥नोहे विषय हा मानव बुद्धिचा । येथे अभिमानाचा पाड काय ॥१८॥उचंबळोनियां येते हे ह्रदय । तुझे धरिले पाय कृपावंत ॥१९॥तुझीया मनींचे कोणा जाणवेल । प्रवेश घडेल तेथे कोणा ॥२०॥मन वाणी जेथे पावती न गति । तेथे मी श्रीपति जाणूं काय ॥२१॥तुज कळविला ह्रदयीचा भाव । सर्वज्ञ तूं देव तार मज ॥२२॥विनायक झाला असे गर्भगळित । अहंकार गळत त्याचा दत्ता ॥२३॥==वाचीयेले ग्रंथ संतांचीया वाणी । त्यांसी अंत:करणी संग्रहीले ॥१॥विचार तेथे केला कांही समजेना । कांही गवसेना माझ्या मना ॥२॥शहाणपणाची केली मी शिकस्त । बुद्धि मी समस्त खर्चियेली ॥३॥परि कांही हातां नाही सांपडले । वर्म न उमगले मजलागी ॥४॥कोण जाणे नाथा तुझिया इच्छेसी । तुझीया लिलांसी कोण जाणे ॥५॥ऐसा कोण आहे येथे महीवर । सर्वज्ञ जो थोर तुज जाणे ॥६॥माझा काय पाड काय मी पामर । काय बोलणार तुझ्यापुढे ॥७॥अनुभव आला बहु आजवरी । प्रकाश अंतरी तेणे माझ्या ॥८॥गेला अहंकार गळला अभिमान । कैचे सुबुद्धिपण पामराला ॥९॥तप ज्यासीं नाही कांही करितां येत । तो काय सांगत शास्त्रांलागी ॥१०॥शास्त्र फ़ार दूर विद्या त्याहूनी दूर । त्याहूनी ईश्वर दूर असे ॥११॥मग आम्हां गति कैची या मूढांसी । बडबड कैसी करीतसो ॥१२॥कोठे श्रुति कोठे स्मृति ती पुराणे । कोण तयां जाणे समग्रत्वे ॥१३॥कोणाचा विषय कोणाचे सामर्थ्य । कोण याथातथ्य जाणताती ॥१४॥सकळहि दूर पल्ला गांठवेना । कांहीच कळेना मतिलागी ॥१५॥विनायक म्हणे बहु गोंधळलो । अप्रबुद्ध झालो बहुतचि ॥१६॥==धांवातरी आतां सांग गुह्य तुझे तूंच । जे का मज साच पटेल की ॥१॥बिंबेल माझ्या मनीं ठसेल ह्रदयी । ऐसे तूं उपायी कथी मज ॥२॥बुद्धिप्रकाशन जयाचीया योगे । ज्ञान होय जागे जये देवा ॥३॥ऐसे कांही सांग या तव दीनासी । किती करुणेसी भाकूं आतां ॥४॥घाबरले मन झालो उतावीळ । अधीर केवळ जन्माचा मी ॥५॥परि तुवां केला माझा की संग्रह । मदीय संदेह फ़ेडावा की ॥६॥जेणे मन:शुद्धी बुद्धि प्रकाशत । ह्र्दय विकासत ऐसे करी ॥७॥कळेना वळेना केली विचारणा । काय नारायण बोलूं आतां ॥८॥धरिले तुझे पाय आतां तूं उपाय । करोनी अपाय हरी माझे ॥९॥सन्मुख मज होई मज ज्ञान देई । अज्ञान माझे जाई ऐसे करी ॥१०॥अनुग्रही मज मज कृपा करी । श्रीगुरु नरहरी वासुदेवा ॥११॥बोलवेना कांही सांगवेना कांही । कळवेना कांही भावार्थाते ॥१२॥तरी आतां नाथा कृपाचि करावी । माझी न पहावी धैर्यवृत्ति ॥१३॥मजपाशी नाही धैर्य की निश्चय । म्हणोनिया पाय धरिले मी ॥१४॥भयभीत माझे ह्रदय सदाचे । ते मी काय वाचे बोलावे की ॥१५॥विनायकाचे तूं करी संरक्षण । दुष्ट निदार्लन साधी नाथा ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP