मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भगवंतास स्वार्पण

श्रीदत्त भजन गाथा - भगवंतास स्वार्पण

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


एवढेच मज करितां येईल । सेवन घडेल येवढेच ॥१॥
दीन हात आणि शिर समर्पिणे । तुझ्या पाय़ी होणे नम्र लीन ॥२॥
याहूनि मजला कांही न साधावे । मानोनियां घ्यावे सेवन हे ॥३॥
जोडिले मी हात शिर नम्र केले । देहा लोळविले तुझ्यापायी ॥४॥
याहूनियां काय सांग अपेक्षिसी । अशक्य मजसी अन्य कांही ॥५॥
कर्तव्य हे माझे शरण तुज होणे । देहा समर्पिणे तुझ्यापायी ॥६॥
तेच केले असे श्रीगुरु अनन्ता । काया भगवंता तुज अर्पिली ॥७॥
विनायक म्हणे जे का ममत्वाचे । अर्पियेले साचे तूजला की ॥८॥
==
भगवंतास स्वार्पण

ह्र्दयांत ठाव तुजला दिधला । देह समर्पिला तुजलागी ॥१॥
मन तुझ्याठाय़ी बांधोनी घातले । सर्वस्वाते केले त्वदर्पण ॥२॥
इतुकेंच माझे माझ्या ममत्वाचे । तुझे ठायी साचे समर्पिले म॥३॥
विनायक म्हणे अंगिकारी आतां । दत्त भगवंता सर्व तुझे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP