मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| श्रीदत्त भजन गाथा - नृसिंह्सरस्वती प्रयाण श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन नृसिंह्सरस्वती प्रयाण Translation - भाषांतर गुरुवार ता. १३-२-१९३०लोकसंग्रह की झालासे बहुत । सम्मर्द लोटत जन लोकांचा ॥१॥वाढलीसे कीर्ति गाजला महिमा । पावताती कामा भक्त जन ॥२॥जे जे शरण येती पूर्ण काम होती । अपरंपार ख्याती जाहलीसे ॥३॥सुजन दुर्जन भाविक अभाविक । दर्शना अनेक येती जन ॥४॥धरुनी कामना लोटती स्थानासी । लेशही भक्तीसी धरिती ना ॥५॥नाही भक्तिभाव शुद्ध अंतरंग । विषयांत दंग जे का सदा ॥६॥भोग-प्राप्तीसाठी ऐसे येती जन । कदा नोहे मन शुद्ध त्यांचे ॥७॥म्हणोनि मनांत विचार आणिला । करुं प्रयाणाला येथोनीयां ॥८॥बहुदिन येथे घडलासे वास । लाविले मार्गास बहु जन ॥९॥भजनपूजनासी लावियेले लोक । आतां आवश्यक आम्हां जाणे ॥१०॥पाचारिती तेव्हा स्वामी ग्रामस्थांसी । कर्दली वनासी जाणे आम्हां ॥११॥पुष्पांचे आसन करोनि आणावे । आम्ही आतां जावे शैल यात्रे ॥१२॥ऐकतां हे मात जन भयभीत । स्वामिसी प्रार्थित नका जाऊं ॥१३॥शैलयात्रा मिसे येथोनी जाणार । अदृश्य होणार निश्चय हा ॥१४॥जाऊं नका स्वामी चरण धरीतो । चरणी लोटतो दीन हीन ॥१५॥जाऊं नका स्वामी आम्हांसी टाकोनी । संसार गहनी ठेवोनिया ॥१६॥जाऊं नका स्वामी वासरां गाऊली । लेकरां माऊली तुम्ही आम्हां ॥१७॥जाऊं नका स्वामी आमुचे कृपाछत्र । इहही परत्र तुम्हीच की ॥१८॥जाऊं नका स्वामी आम्हांसी टाकोनी । अनाथ करोनी जाऊं नका ॥१९॥जाऊं नका स्वामी येतो काकुळती । द्रव तुम्हांप्र्ति येवो नाथा ॥२०॥जाऊं नका स्वामी आई बाप धनी । तुम्हीं त्रिभुवनी आम्हां लागी ॥२१॥जाऊं नका स्वामी भाऊ बहिण तुम्ही । कोणाकडे आम्ही पाहूं सागा ॥२२॥जाऊं नका स्वामी तुम्ही पंचप्राण । उरले न त्राण तुम्हाविणे ॥२३॥जाऊं नका स्वामी चैतन्य देहींचे । तुम्ही आम्हां सांचे जाऊं नका ॥२४॥जाऊं नका स्वामी तुम्ही अन्नपाणी । नेत्री येत पाणी आमुचीया ॥२५॥जाऊं नका स्वामी आम्हांसी प्रकाश । तुम्ही असो ईश जाणावे की ॥२६॥जाऊं नका स्वामी आमुचा जिव्हाळा । तुम्हीच स्नेहाळा जगती या ॥२७॥जाऊं नका स्वामी शरीरांत रक्त । तैसे तुम्ही युक्त उपमाया ॥२८॥जाऊं नका स्वामी खचित सांगतो । धरणे धरतो तुम्हांपाशी ॥२९॥जाऊं नका नका पदर धरीतो । आडवे पडतो मार्गावरी ॥३०॥गाणगापूरवासी जन प्रार्थिताती । नृसिंहसरस्वती जाऊं नका ॥३१॥भक्तानुकंपी देव तुमचे महिमान । सदा भक्ताधीन ऐशा कीर्ति ॥३२॥ऐसे परोपरी विनवितां त्यांसी । देव निश्चयासी सांगताती ॥३३॥आम्ही येथे असो सदा तुम्हांपाशी । लौकिक मतासी जातो आम्ही ॥३४॥कलिकाळास्तव अदृश्य राहणे । आम्हां असे जाणे शैलयात्रे ॥३५॥तुम्हां याची साक्ष निश्चये येईल । तुम्ही अनुभवाल माझी कृपा ॥३६॥जो का कोणी माझे चरित्र गाईल । प्रबंध रचिल कवित्वाचे ॥३७॥जाणोनियां ताल राग जो गाईल । यश माझे वदेल जो का जाणा ॥३८॥त्याचेपाशी आहे सदा, हेच भाक । तुम्हां जन लोक देत असे ॥३९॥ऐसे म्हणोनियां आसन घातले । पुष्पासन भले गंगेवरी ॥४०॥बैसोनियां जातां जन दु:खी होती । नावेकरी येती सांगताती ॥४१॥स्वामिची आम्हां डोळा देखियेली मूर्ति । तुम्हांवरी प्रीति सांगितली ॥४२॥तंव प्रसाद्पुष्पे पावली तीरासी । परम भावेसी घेती जन ॥४३॥परतोनि जातां मठांत देखती । दंडधारी यति स्वामिराज ॥४४॥आम्ही येथे असो दु:ख नका करुं । धरा हा निर्धारु सांगताती ॥४५॥असित पक्षमाघमास प्रतिपदा । गमन वरदा घडले की ॥४६॥तोच पुण्य दिन स्मरणाचा । वंदे माझी वाचा महिमान ॥४७॥विनायक म्हणे माझेपाशी देव । सदा त्याचा भाव आहे जाणा ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : January 07, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP