TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
बालस्वरुप वर्णन

श्रीदत्त भजन गाथा - बालस्वरुप वर्णन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


बालस्वरुप वर्णन
क्रीडा करण्यासी प्रगट दत्तदेव । धरोनियां भाव सुकुमार ॥१॥
नाचती खेळती हांसती आम्हांसवे । वर्तती बाळभावे आम्हांपाशी ॥२॥
बाळस्वरुप हे येथील द्त्ताचे । अधिष्ठान साचे बाळरुप ।
भजन करणे पूजन करणे । आनंदे नाचणे प्रेमभरे ॥४॥
कीर्तन करणे यश विस्तारणे । डुलत राहणे आम्हांपाशी ॥५॥
मधुर हांसणे मधुर पाहाणे । मधुर ते गाणे यश सदा ॥६॥
मधुर बोलणे माधुरी ओतणे । मधुर करणे सर्व कांही ॥७॥
ऐसा आहे हेतु श्रीगुरुदत्ताचा । तोच सिद्ध साचा होणार की ॥८॥
बाळस्वरुप या स्थानी मूर्तिमंत । राहत क्रीडत निजानंदे ॥९॥
विनायकाठायी करी बाळलीला । दत्तघन सांवळा अलौकिक ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-17T21:39:07.0300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

inclined gauge

  • नत प्रमापी 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.