मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कृपाळू वासुदेव

श्रीदत्त भजन गाथा - कृपाळू वासुदेव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १४-८-१९३०

वासुदेवावरी माझा पूर्ण भाव । माझा गुरुदेव तोच सखा ॥१॥
विसावा तो माझा आनंद मनींचा । सुखधाम साचा मजलागी ॥२॥
त्याचेसम नाही कोणीही प्रेमाचा । दुजा मज साचा जाणा कोणी ॥३॥
माझ्या निश्चयाचा दृढ भावनेचा । वासुदेव साचा जाणा एक ॥४॥
विनायकाचा तो पूर्ण कैवारी या । तया गुरुराया दया त्याची ॥५॥
==
कृपाळू वासुदेव

देव माझा वासुदेव । त्याचेवरी माझा भाव ॥१॥
धरिले मी दोन्ही पाय । हाच मजसीं उपाय ॥२॥
तारक तो मजलागी । दया थोर त्याजलागी ॥३॥
कृपाळु तो परमेश्वर । माझे जीविचा आधार ॥४॥
मज सौख्याचा सागर । वासुदेव विश्वंभर ॥५॥
विनायका त्याचा लळा । भजतसे त्या स्नेहाळा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP