TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
स्खलनशीलता

श्रीदत्त भजन गाथा - स्खलनशीलता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


स्खलनशीलता
गुरुवार ता. ९-१०-१९३०

चुकतो आम्ही किती नाही तया मिती । होईना गणती अपराधां ॥१॥
पाउलोपाउली दोषार्ह वर्तन । येतसे घडोन किती सांगू ॥२॥
जरी देह नीट ठेविला जपोनी । मन अडमडोनी दोष करि ॥३॥
देह आणि मन जरी सांभाळीली । वाणी मस्ती भली करीतसे ॥४॥
देह वाणी मन यांसी साभाळितां । कष्ट अवधूता अगणित ॥५॥
किती अवधान ठेवावे जरी तरी । भूल अवसरी पडतसे ॥६॥
कोठे तरी जाते संधान आपुले । उपाय न चले येथ कांही ॥७॥
विनायक म्हणे ठक कैशी पडे । निदान न सांपडे कोणालाही ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-17T21:33:37.4100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

स्पष्ट

  • वि. १ स्वच्छ ; साफ ; उघड ; असंदिग्ध . १ तंतोतंत ; बिनचूक ( भविष्य , जमाखर्च इ० ) [ सं . स्पश् ‌ = व्यक्त करणे ] क्रांति --- स्त्री . आकाशांतील गोलांचे कोनात्मक अंतर . 
  • ०ग्रह - करणे ) राशिचक्रांतील प्रहांचें राणिचक्रारंभापासून अंतर ( काढणे ). 
  • ०परिधि पु. पृथ्वीची अक्षांशरेखा . 
  • ०वक्ता वि. १ उघडपणें भीडभुर्वत न ठेवंता बोलणार . २ मनांत कांही लपवून न ठेवता उघडपणें बोलणारा . स्पष्टीकरण न . विवरण ; साफ , उबड , स्वच्छ , करणे ; विशदीकरण ; उघड करणें ; उदाहरणें देऊन मनावर बिनविणे : प्रसिद्ध करणें , करण पहा . २ स्पष्टीकृति स्त्री . ग्रहाचे खरे रेखशं शोधून काढण्याची रीत . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.