TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
प्रार्थना

श्रीदत्त भजन गाथा - प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


प्रार्थना
आतां माझी हे प्रार्थना । तुजलागी दयाघना ॥१॥
जागृत ठेवी तुझे स्थान । दुष्टां व्हावे येथे दंडन ॥२॥
भजनाची ही भूमिका । तुवां दिली आम्हां भजकां ॥३॥
आपुली ती प्रतिपाळावी । विघ्ने येथील नासावी ॥४॥
दुष्ट दर्भदांसी शिक्षा । साधु जनालागी दीक्षा ॥५॥
करी धर्म संरक्षण । अधर्माचे निर्मूलन ॥६॥
प्रगट करी तव स्थान । जेणे रंगे तव भजन ॥७॥
साक्षात्कारे दर्शन द्यावे । आम्हालागी अनुग्रहावे ॥८॥
आमुच्या इच्छा व्हाव्या पूर्ण । तव कृपे नारायण ॥९॥
इह पर सद्गतीते । आम्हां द्यावे तुवां निगुते ॥१०॥
याचसाठी मी प्रार्थितो । तुझा प्रसाद मागतो ॥११॥
जनकार्यासाठी देवा । प्रसाद मजलागी व्हावा ॥१२॥
सिद्ध करीं मजलागी । प्रगटवी महिमा जगी ॥१३॥
दत्तात्रेय कृपासिंधू । दिनाचा तूं जैसा बंधु ॥१४॥
तुझ्या पायांसी शरण । घालतिसे लोटांगण ॥१५॥
उपकार व्हावा नाथा । मजवरी श्रीसमर्था ॥१६॥
याचसाठी मी मागतो । चरणी शिर मी ठेवितो ॥१७॥
काम-कल्पद्रुम नाम । साच करी परंधाम ॥१८॥
विनायकाचा कैवारी । पाव आतां तूं सत्वरी ॥१९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-05T19:44:45.4030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lateral spherical aberration

  • पार्श्व गोलीय विपथन 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी म्हणजे काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.