मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| कोजागरी श्रीदत्त भजन गाथा गणेश जयंती शिवरात्र राम नवमी हनुमान जयंती. नृसिंह जयंती वासुदेव-जयंती कृष्णजयंती वराह जयंती वामन जयंती देवी चरित्र गुरुद्वादशी भाऊबीज सप्ताह-अनुष्ठान उत्सवाची मागणी उत्सव चंपाषष्ठी वासुदेव चरित्रसार दर्शनसुख अहं दत्तोऽस्मि ईशप्रसाद लक्षणें स्वरुपवर्णन दर्शनलालसा क्रीडा लालसा दत्तदासांची श्रीमंती दत्तभक्ताची स्थिति वासुदेव चरित्र सार वासुदेवाचा धांवा श्राद्धविधी उत्तरगति कोजागरी योग्याची लक्षणे नरकासुर वध श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध स्वरुपवर्णन सदा वस देवा ठायी योगाभ्यास विष्णुप्रबोध सह्यवनश्री व देवांचा विलास विरक्तीची व्याख्या कृतज्ञता वचन प्रार्थना स्वरुपवर्णन भजनछंद गजेंद्र मोक्ष ये यथा मां प्रपद्यन्ते ईश्वरावर निस्सीम निष्ठा दर्शन लालसा सत्यापरता नाही धर्म नृसिंह्सरस्वती प्रयाण भिल्लीणी आख्यान कृतज्ञता वचन ईश्वराचे विनायकास सहाय्य गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग दत्तमयत्रिभुवन तमाशा ईश्वर आणि भक्त विनायकाचा संकल्प भक्ताभिमानी देव भीष्म प्रतिज्ञा ईश्वराची भक्तांशी ऐक्यता ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना विश्वामित्र मख रक्षण भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती देवकार्यासाठी धैर्य पाहिजे देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत कनवाळू देव कनवाळू देव दृष्टांत प्रभुवात्सल्य परमेश्वराची शब्दातीतता शबरी आख्यान ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला दत्त भार्गव भेट दत्त तादात्म्य देव आणि भक्त यांचा रंग देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति वसंतश्री देवांचा वसंत महोत्सव रमामाधव योग गंगावतरण शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ? गंगावतरण एको रस: करुण एव देवलीलांचे अगम्यत्व व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा ) वासुदेव चरित्र सार विनायकाचे कोडे दु:ख स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह: गुरु माउली कृपाळू वासुदेव "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ईशसेवनासक्ती जगत्पिता पितृत्वाचे कारण अन्न उपासनामहती योगाचा दुरुपयोग कर्माने मोक्ष मिळत नाही शुंभ-निशुंभ कथा स्खलनशीलता मन हे ओढाळ गुरुं देहप्रमाद उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर भगवंतास स्वार्पण भक्तत्राता परमेश्वर ’अहं दत्तोऽस्मि’ बालस्वरुप वर्णन भक्त आणि देव यांची एकरुपता आज्ञा विनायकाचा अनुभव विनायकाची गुरुमयता श्रीगुरुंचा आशीर्वाद श्रीगुरुंचा निरोप श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन प्रस्थानकाळी आज्ञा मागणी श्रीदत्त भजन गाथा - कोजागरी श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन कोजागरी Translation - भाषांतर गुरुवार ता. १७/१०/१९२९कौमुदी हे आज पौर्णिमा लक्षुमीची । आज्ञा हे शास्त्राची क्रीडा धरा ॥१॥घेवोनीयां फ़ांसे आजचीये राती । क्रीडातां ये गति आनंदाची ॥२॥अंगासि उटणीं लावोनि सुगंधी । वस्त्रें परमानंदी लेवावी की ॥३॥अक्षक्रीडेलागी करिल त्या नरा । लक्ष्मी शुभवरा देत असे ॥४॥वित्तं प्रयच्छामि अक्ष क्रीडणार्या । रात्री जागणार्या नरालागी ॥५॥निशीथ काली वरदा लक्षुमी बघत । भूवर जागत कोण असे ॥६॥देईन धन त्यासी करीन समर्थ । पुरवीन अर्थ सकळ त्याचे ॥७॥अंभृण ऋषीची दुहिता हे ज्ञानी । संचरे त्रिभुवनी विमुक्त जी ॥८॥समुद्रांतूनी येत क्रीडत बाहेरी । बोलत वैखरी अनुपम ॥९॥रुद्रवसु आदित्य यांसह चरामि । सकळ धारयामि माझे ठायी ॥१०॥इंद्राग्निवरुण अश्विनौ ते देव । सर्व माझा भाव जाणत की ॥११॥सकळ जग मजठायी हे जाणावे । ब्रह्मरुप पहावें सदा मज ॥१२॥उत्तम हवणी तैशा सोमरसे । यज्ञ यजीतसे यजमान ॥१३॥त्याची फ़लदात्री मजला जाणावी । मजला गणावी याज्याहुती ॥१४॥यज्ञ देवांमध्ये मीच श्रेष्ठ असे । विश्व पूजीतसे मजलागी ॥१५॥जे जे कांही देव कर्म आचरिती । कर्तृत्व निश्चिती माझे सारे ॥१६॥माझे मनी काम भक्तांसी रक्षावे । कर्तृत्व ऐकावे माझे तेव्हा ॥१७॥सामर्थ्यवान त्यांसी तेव्हा मी करिते । क्नित्य संरक्षिते प्रियदासां ॥१८॥ब्रह्मदेव त्यांसी करोनि ठेविते । सकळ त्यांसि देते सामर्थ्याला ॥१९॥विष्णु शिव ब्रह्मा सकळ करिते । तयां बैसवीते ब्रह्मपदी ॥२०॥माझे महात्म्य हे जो नर न जाणे । त्याची हानी होणे सर्वस्वाची ॥२१॥म्हणोनियां मीच मुखे हे सांगते । ब्रह्मज्ञान कथिते तुम्हांलागी ॥२२॥श्रद्धेने हे तुम्ही ब्रह्म परिसावे । तेणे धन्य व्हावे म्हणे देवी ॥२३॥स्वतंत्र्य मी देवी विश्वाचे कारण । करीत निर्माण त्रैलोक्यासी ॥२४॥असंग मी आहे तटस्थ मी आहे । चैतन्य रुप आहे मजलागी ॥२५॥सकळ करोनी उदासीन आहे । ज्ञान कथिताहे ऐसे जाणा ॥२६॥विनायक म्हणे संतुष्टेल रमा । सेवितां परमा वरदा जी ॥२७॥ N/A References : N/A Last Updated : January 05, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP