मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| एको रस: करुण एव श्रीदत्त भजन गाथा गणेश जयंती शिवरात्र राम नवमी हनुमान जयंती. नृसिंह जयंती वासुदेव-जयंती कृष्णजयंती वराह जयंती वामन जयंती देवी चरित्र गुरुद्वादशी भाऊबीज सप्ताह-अनुष्ठान उत्सवाची मागणी उत्सव चंपाषष्ठी वासुदेव चरित्रसार दर्शनसुख अहं दत्तोऽस्मि ईशप्रसाद लक्षणें स्वरुपवर्णन दर्शनलालसा क्रीडा लालसा दत्तदासांची श्रीमंती दत्तभक्ताची स्थिति वासुदेव चरित्र सार वासुदेवाचा धांवा श्राद्धविधी उत्तरगति कोजागरी योग्याची लक्षणे नरकासुर वध श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध स्वरुपवर्णन सदा वस देवा ठायी योगाभ्यास विष्णुप्रबोध सह्यवनश्री व देवांचा विलास विरक्तीची व्याख्या कृतज्ञता वचन प्रार्थना स्वरुपवर्णन भजनछंद गजेंद्र मोक्ष ये यथा मां प्रपद्यन्ते ईश्वरावर निस्सीम निष्ठा दर्शन लालसा सत्यापरता नाही धर्म नृसिंह्सरस्वती प्रयाण भिल्लीणी आख्यान कृतज्ञता वचन ईश्वराचे विनायकास सहाय्य गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग दत्तमयत्रिभुवन तमाशा ईश्वर आणि भक्त विनायकाचा संकल्प भक्ताभिमानी देव भीष्म प्रतिज्ञा ईश्वराची भक्तांशी ऐक्यता ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना विश्वामित्र मख रक्षण भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती देवकार्यासाठी धैर्य पाहिजे देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत कनवाळू देव कनवाळू देव दृष्टांत प्रभुवात्सल्य परमेश्वराची शब्दातीतता शबरी आख्यान ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला दत्त भार्गव भेट दत्त तादात्म्य देव आणि भक्त यांचा रंग देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति वसंतश्री देवांचा वसंत महोत्सव रमामाधव योग गंगावतरण शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ? गंगावतरण एको रस: करुण एव देवलीलांचे अगम्यत्व व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा ) वासुदेव चरित्र सार विनायकाचे कोडे दु:ख स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह: गुरु माउली कृपाळू वासुदेव "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ईशसेवनासक्ती जगत्पिता पितृत्वाचे कारण अन्न उपासनामहती योगाचा दुरुपयोग कर्माने मोक्ष मिळत नाही शुंभ-निशुंभ कथा स्खलनशीलता मन हे ओढाळ गुरुं देहप्रमाद उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर भगवंतास स्वार्पण भक्तत्राता परमेश्वर ’अहं दत्तोऽस्मि’ बालस्वरुप वर्णन भक्त आणि देव यांची एकरुपता आज्ञा विनायकाचा अनुभव विनायकाची गुरुमयता श्रीगुरुंचा आशीर्वाद श्रीगुरुंचा निरोप श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन प्रस्थानकाळी आज्ञा मागणी श्रीदत्त भजन गाथा - एको रस: करुण एव श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन एको रस: करुण एव Translation - भाषांतर गुरुवार ता. १२-६-१९३०करुणरस श्रेष्ठ सर्व रसांमाजी । श्रेष्ठता त्यांत जी वर्णवेना ॥१॥करुणेची मूर्ति मूर्त विश्वभंर । करुण रस थोर मूर्तिंमंत ॥२॥करुणरस जेव्हा दाटे ह्रदयांत । तेव्हां परिस्फ़ुरत जगदात्मा ॥३॥करुणेपशी देव देव करुणेचा । देव कारुण्याचा जलनिधी ॥४॥करुणरसे शांत जो का वावरत । उपमा निश्चित त्यास नाही ॥५॥सकळ इंद्रियांत करुणा भरत । दिसोनियां येत तिची छटा ॥६॥कळी उमलत ह्रदय विकसत । प्रेम उचंबळत किती सांगूं ॥७॥शुद्ध सात्विकाचा बनाव बनत । रंग उधळत सत्वपूर्ण ॥८॥करुणा नेत्रांत करुणा श्रवणी । तैशी अंत:करणी स्पष्ट दिसे ॥९॥अंतर्बाह्य येतो तिचा अनुभव । लीनतेचा भाव साकारतो ॥१०॥शुद्ध प्रेम आहे करुणेच्या पाशी । अन्य विकारांसी ठाव नाही ॥११॥करुणेने देव प्रेमे आळवावा । सर्वत्र पहावा त्याच रसे ॥१२॥करुणेने पाही तूं या विश्वाकडे । तुज दृष्टी पडे करुणत्व ॥१३॥कारुण्याने आहे भरला विश्वांत । तुजला जोडत कारुण्याने ॥१४॥विनायक म्हणे करुणामय होई । मग तूं सदा घेई दर्शनाला ॥१५॥==करुणेने बोला करुणेने चाला । सदा कारुण्याला चित्ती धरा ॥१॥इंद्रियांत तेवि देहांतही ठेवा । नित्य करुणाभावा कारुण्याने ॥२॥मन बुद्धि चित्त तैसा अहंकार । कारुण्यप्रसर तेथे ठेवा ॥३॥करुणा पाहणे करुणा ऐकणे । करुणा चिंतणे करुणेत ॥४॥करुणेचा स्पर्श रस करुणेचा । शब्द करुणेचा आदरावा ॥५॥भाव करुणेचा कारुण्य भावना । संस्कार हा मना सदा द्यावा ॥६॥ह्रदय करुण स्फ़ुरण करुण । रस उचंबळून यावा तोच ॥७॥भरोनियां जाई करुणरसाने । देवमय होणे तुझे तेणे ॥८॥करुणेने मूर्त देव बनशील । मुक्ति चाखशील देहींच तूं ॥९॥प्रेमळपणा मूर्त आहे करुणेपाशी । लाभ इतरांसी नाही त्याचा ॥१०॥देव प्रेमळाचा भुकेला भक्तीचा । जणुं करुणेचा बनलासे ॥११॥करुणेहुनी नाही भक्ति ती निराळी । केवळ बनली करुणेची ॥१२॥भक्तीचे स्वरुप जाणावी करुणा । शुद्ध-प्रेम-खुणा करुणाच ॥१३॥जेथे आहे जाणा करुणेचा वास । तेथेच प्रेमास उद्भव की ॥१४॥करुणा अधिष्ठान भक्तीचे प्रेमाचे । आर्द्रपण साचे करुणेचे ॥१५॥अमृताचा रस जाणावी करुणा । काय मी वल्गना करुं अन्य ॥१६॥दृष्टांतासी नाही कांही वस्तुजात । सर्व करुणेत झांकले की ॥१७॥ब्रह्मांण्डांत हीच आदिशक्ती जाणा । म्हणुनि करुणा आदरावी ॥१८॥विनायक म्हणे मज करुणामय । करा दत्तात्रेय निजकृपें ॥१९॥==धांवागुरुवार ता. १९-६-१९३०दया मजवरी व्हावी भगवंता । म्हणोनियां ताता शरण मी ॥१॥दुबळा पामर काय करणार । अहो करुणाकर गुरुनाथा ॥२॥कधी नाही यश कोणत्या कार्यांत । पापचि भोगीत जैसा असे ॥३॥किती शत्रु मज किती विघ्ने मज । तुज महाराज विदित की ॥४॥तुज सर्व ठावे आहे कृपावन्ता । तुज गुरुदत्ता काय सांगू ॥५॥मज नियोजिले आपुल्या कार्यासी । अपात्र तयासी मी तो आहे ॥६॥मजवरी नाही देवा तुमची कृपा । ऐसे मायबापा वाटतसे ॥७॥आजवरी केली जे का कांही सेवा । तुज बासुदेवा रुचली न ॥८॥करवोनी जैसे तुवां बा घेतले । तैसेच वाहिले तव पदी ॥९॥मजवरी कोप एवढा कां केला । श्रीगुरुदयाळा सांगावे की ॥१०॥आम्ही चुकणार निश्चित हा अर्थ । आम्हां परमार्थ दूर आहे ॥११॥आम्ही मोक्ष नेणो मुक्ति नच जाणो । कोणी कांही म्हणो आम्हांलागी ॥१२॥आमुचा हा स्वार्थ तुझिये प्राप्तिचा । तेच नित्य वाचा वदतसे ॥१३॥तुझी सेवा देवा करणे अहर्निश । तूज जगदीश तोषविणे ॥१४॥हाच आहे ठावा आम्हां परमार्थ । याहूनीयां अर्थ ठावा नाही ॥१५॥आम्हां असे दैव उणे द्त्तनाथा । तुजला समर्था सर्व ठावे ॥१६॥पूर्वजन्मकर्म नाहीच चांगले । भोगवि ते भले दु:ख मज ॥१७॥आजवरी दु:ख बहुत भोगिले । बहुत साहिले तुझ्या कृपे ॥१८॥परी अजूनियां पाप न ते सरे । म्हणोनी उदारे कृपा कीजे ॥१९॥विनायक आला तुज काकुळती । तरि तूं दत्तयति कृपा करी ॥२०॥==धांवातुवांच मज नाथ सेवेत गोविले । मजला घातले भजनांत ॥१॥अधिकार माझा मुळीच नसतां । तुवां भगवंता केले ऐसे ॥२॥मजसि पात्रता कोठलि बा नाथा । नाही जाणा स्वार्था जिंकीयेले ॥३॥स्वार्थी बहु प्रीति ओंगळ मनिंचा । ऐसा असे साचा पामर मी ॥४॥विषयप्रीति वसे सदा ह्रदयांत । पाप ते सांठत थोर ह्र्दी ॥५॥आश्चर्य हे वाटे अद्भुत ही गोष्ट । कैसा पापी नष्ट जन्मलो मी ॥६॥कली तुवां दया केली तुवां कृपा । माझ्या नाथा तापा शमवाया ॥७॥परी सर्व वायां झाले दत्तात्रेया । जरी तुझ्या पायां शरण मी ॥८॥अहोरात्र तुझी सेवाच मी केली । तुजला वाहिली सर्व सुखे ॥९॥नाही केला कधी देहचा विचार । नाहीच विकार अन्य मज ॥१०॥आवडीने नाथा तूज मी सेविले । नाम मी घेतले तुझे दत्ता ॥११॥तुझ्या प्रतापाची ग्वाही म्यां दिधली । सकलां सांगितली खूण गोष्ट ॥१२॥तुझी सेवा कधी विफ़ळ न होत । प्रत्ययास येत सदा जाणा ॥१३॥ऐसे जे मी आजवरी आचरलो । देवा मी वागलो तुझ्यापाशी ॥१४॥सकळ वायां झाले देवा वेडावलो । तुझ्या पायां आलो शरण मी ॥१५॥विनायकालागी तुमचा आधार । दुसरा विचार कांही नाही ॥१६॥==धांवाकैसे माझ्या देही पातक राहिले । मुळी न जळाले सांग दत्ता ॥१॥काय जिह्वेने जे नाम बा घेतले । फ़ुकट जाहले तुझे सांग ॥२॥अहोरात्र तुझे चिंतन जे केले । नाथा कोठे गेले सांगावे की ॥३॥माझिया इंद्रियांत माझिया चित्तांत । माझ्या अंत:करणांत वसलासी ॥४॥काय व्यर्थ झाला देवा सहवास । माझीये पापास धुणी नाही ॥५॥कोठे गेली सेवा कोठे गेली भक्ती । कोठे ती विरक्ती माझी दत्ता ॥६॥कोठे गेली नीति पुण्य आचरण । शुद्ध अंत:करण कोठे गेले ॥७॥कोठं गेला माझा सात्विक अहंकार । कैशी मज हार पातलीसे ॥८॥हारलो मी देवा खचित हारलो । तुज शरण झालों परोपरी ॥९॥आतां कोठे दुजा मजला आसरा । तुजवीण ईश्वरा सांगे मज ॥१०॥उदासीन झालो मनांत खोचलो । बहुत लाजलो दयाळा रे ॥११॥माझिया तोंडासी काळे की लाग्ले । सकळ सोपले माझे नाथा ॥१२॥निर्मळ मी नाही मनाने कायेनं । तैसा मी वाचेने शुद्ध नाही ॥१३॥आचार उच्चार तैसा तो विचार । माझा असे फ़ार गलिच्छ की ॥१४॥ऐसा पातक्यासी सेवेते लाविले । कल्याणार्थ भले माझीयाच ॥१५॥परी मी अकल्याण जोडिले बहुत । ऐसेंच वाटत गुरुनाथा ॥१६॥नाही स्वार्थ नाही देवा तुझी कृपा । कांही मायबापा साधियेले ॥१७॥विह्रळ ह्र्दयी तुजला शरण । मज नारायण कृपा करी ॥१८॥कल्याणाची गोष्ट तुवां आरंभिली । परी व्यर्थ झाली मजपाशी ॥१९॥अपात्र मी खरा हेंच गा निश्चित । म्हणोनि भोगित विपत्तीते ॥२०॥साधुसंतांनी जे सांगोनि ठेविले । ब्रीदवाक्य भले तुझे दत्ता ॥२१॥अनुभवा मज जोंवरि न आले । तोंवरि ठरलें अपात्रत्व ॥२२॥मज अमंगळा केलेस जवळी । तेणे वनमाळी तुज दोष ॥२३॥अमंगळपण माझे जे का नाथा । तुजला समर्था डसों पाहे ॥२४॥परी तूं दयाळ मज पक्षाळिसी । मजला शोधिसी परोपरी ॥२५॥जैसे कावळ्यांसी घालितां पयस्नान । तया पांढरेपण येईनाच ॥२६॥ह्रदयांत तुझा सदा असे वास । जिह्वेवरी नामास ठेवियेले ॥२७॥ऐशी तुझी जरी संगति मजला । तरि न पापाला हानि माझ्या ॥२८॥माझिया नेत्रांत माझिया कानांत । माझे शरीरांत भरलासी ॥२९॥रात्रंदिन माझ्या ठायीं तव वास । अससी जाण खास मजपाशी ॥३०॥मजला सोडुनी कधी न तूं जासी । मज वियोगासीं न देसी तूं ॥३१॥ऐसे असोनियां पाप न जळत । दैव न सोडीत मजलागी ॥३२॥म्हणोनियां वाटे पापात्मा प्रबळ । मीच एक खळ जन्मलो की ॥३३॥मागील चरित तव बा ऐकतां । ऐसी नाही वार्ता ऐकियेली ॥३४।कोठे नाही ऐशी मात पुकारली । कोणी न सांगितली आजवरी ॥३५॥आशा धरियेली तुझीये कृपेची । विफ़ळ ती साची झाली दत्ता ॥३६॥आशा धरिली होती तव साक्षात्कारी । विश्वास अंतरी धरिला होता ॥३७॥वाटोळे की झाले माझ्या विश्वासाचे । तैसे सदाशेचे कृपावन्ता ॥३८॥तूझे नाम नाही ठरले सामर्थ्याचे । माझ्या ठायी साचे गुणवन्ता ॥३९॥माझेमुळे तुज उणेपण आले । मन हे खोचले तेणे बहु ॥४०॥परी मज नाही तुजवीण गति । म्हणोनि श्रीपति बोलतो मी ॥४१॥बोलावे कोणासी देवा म्यां सांगावे । उघड करावे अंत:करण ॥४२॥कोणापाशी दु:खावेग उघडावा । तुजविण ठावा कोणी नाही ॥४३॥बहुता दिसांची तुझीच संगति । म्हणोनि तुजप्रति बोलतो मी ॥४४॥विनायक आहे बहु दु:खावला । तुजला प्रेमळा दया येवो ॥४५॥==धांवाआई बाप भाऊ बहिण सर्व नाते । तुज श्रीगुरुते लावोनीया ॥१॥मित्र तूंच माझा तूंच माझा धनी । सदा गृही वनी सोबती तूं ॥२॥माझी जे का छाया किंवा जो का प्राण । तैसे नारायण तुझे नाते ॥३॥माझा आत्माराम तूंच दत्तात्रेय । होते धरिले पाय म्हणोनियां ॥४।कोठे गेला माझा भाव हा सांगावा । श्रीगुरु दत्तदेवा मजलागी ॥५॥नाही की उल्हास माझीये मनासी । धैर्य ह्रदयासी नुरले की ॥६॥भयभीत भ्याड होवोनी राहिलो । निराश मी झालो असे देवा ॥७॥पुढे कांही मज दिसेना प्रकाश । स्वामि जगदीश गुरुराया ॥८॥टाकल्यासम मज आतां नका करुं । कोणा हांका मारुं सांगा माते ॥९॥निर्वाणीचा सखा तूंच दत्तनाथ । पुरवावे अर्थ माझे आतां ॥१०॥मी तो जाणतसे माझी जी योग्यता । माझी बा बहुता अजाणता ॥११॥सकळ तुझे असे करणे वासुदेवा । याच जाण भावा भावितो मी ॥१२॥विनायक लोळे तुझीये चरणी । श्रीगुरुचक्रपाणी कृपा करा ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP