TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
मन हे ओढाळ गुरुं

श्रीदत्त भजन गाथा - मन हे ओढाळ गुरुं

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मन हे ओढाळ गुरुं
प्रांजळपणाने विचार करावा । अपुला पहावा इतिहास ॥१॥
जन्मल्यापासोनी चरित स्मरावे । बहु आठवावे स्वीयवृत्त ॥२॥
विचार करितां सर्व आठवेल । उमगोनी येईल सर्व कांही ॥३॥
ज्ञात आणि तैसे अज्ञात की दोष । विशेष अविशेष किती झाले ॥४॥
सूक्ष्म नजरेने पाहतां दिसेल । स्पष्टचि होईल आपणासी ॥५॥
ठायी ठायी मन किती हे लाजेल । खंती किती पावेल मिती नाही ॥६॥
किती दोष सहज घडोनियां येती । मुळी न समजती आपणांसी ॥७॥
सगळ्यांत मन आहे महाठक । धरीना विवेक कांही केल्या ॥८॥
केव्हांच ठकवी केव्हांच उधळे । कैसे याचे चाळे शमवावे ॥९॥
विनायक म्हणे मनाचीया पाय़ी । नर ये उपायी पदोपदी ॥१०॥
==
कायावाचामन । यांचे निगडन । वहुत कठीण ॥
कायावाचामन यांचे निगडन । बहुत कठीण योग्यालागी ॥१॥
हातोहात कैसे आम्हां ठकविती । अजब त्यांची क्लृप्ति जाणावी की ॥२॥
किती जरी वाचा स्वाधीन ठेविली । फ़जितखोर भली फ़सवीत ॥३॥
किती तरी करा नियम वाचेसी । पाडिल केव्हां फ़सी कळेनाच ॥४॥
भलतेच जाई उच्चारोनी वाणी । मग आणीबाणी तपस्येला ॥५॥
थोर थोर योगी वाणीचीया योगे । फ़सले न तगे धैर्य त्यांचे ॥६॥
परम शांत जरी वसिष्ठ ते मुनि । प्रसिद्ध त्रिभुवनी शांतिरुप ॥७॥
तयांसीही जाणा वाणीने ठकविले । हानिला आणिले तपस्येसी ॥८॥
विनायक म्हणे करितां विचार । दिसतो संचार किती जातो ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-17T21:34:35.8930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पाष्ठा

  • m  A gold wire. The ridge of a building. 
RANDOM WORD

Did you know?

I need something, but I cant find it or is it not there?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.