मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विनायकाचा अनुभव

श्रीदत्त भजन गाथा - विनायकाचा अनुभव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


निघताती गुरु घेवोनी सांगाती । आम्हां शिष्यांप्रति निजकार्या ॥१॥
आपुलिया कार्यी आम्हांसी योजाया । निज सांप्रदाया वाढवाया ॥२॥
भजनमार्गाते प्रसृत कराया । निज वाढवया उपासना ॥३॥
आम्हांसवे घेती निज परिवार । आमुचा बडिवार॥ कार्यासाठी ॥४॥
आमुच्या देहांत नित्य त्यांची वसती । सकळ करविती निजकार्या ॥५॥
जेथे गुरु तेथे आहे कल्पतरु । लक्ष्मी साक्षात्कारु वसे तेथे ॥६॥
तेथे आनुकूल्य समृद्धि साकार । प्रसादाचे बळ थोर तेथे ॥७॥
आम्हां नित्य वास गुरुपदापाशी । तेणे स्वानुभवासी बोलतसो ॥८॥
विनायक म्हणे आम्ही गुरुमय । तेणे आम्हां श्रेष्ठ्य जगी असे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP