मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ८०

क्रीडा खंड - अध्याय ८०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पार्वति करीत तपसा, द्वादश वर्षें यथाविधी नेमें ।

तेव्हां गजाननानें, दर्शन दिधलें तियेस बहु प्रेमें ॥१॥

आज्ञा केली तिजला, वर मागें तूं त्वरीत इच्छीत ।

तेव्हां वदली गिरिजा, व्हावें देवा मदीय कीं सूत ॥२॥

राहें माझे सदनीं, वदतां दिधला तियेस वर तोच ।

सत्वर सूत तियेचा, झाला कथिलें शिवास तें साच ॥३॥

शंकर वदले गिरिजे, घेईं अवतार तो तुझे सदनीं ।

भूभार नष्ट करुनी, सुशान्त अशि तो करील ही अवनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP