मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४७

क्रीडा खंड - अध्याय ४७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

कीर्तीला मुनि सांगतात सुभगे ऐकें दिवोदास तो ।

देई भाक तयास मी तदुपरी बोधापरी वागतो ॥

घेई साध्य करुन तो गणपती लोकांस या या परी ।

विष्णू बुद्ध नटे वसे नगरिंचे बाह्य-प्रदेशावरी ॥१॥

मायेनें अपुल्या जनांस करितो मोहीत तेव्हां हरी ।

वेदांचा उपयोग हा त्यजुनियां निर्गूण भक्ती बरी ॥

आहे देव खरोखरी हृदयिं तो सर्वां जिवांचा वदे ।

मूर्तीसी भजणें खरोखर असे मूर्खत्व ऐसें वदे ॥२॥

देहासी म्हणती सुजाण अवघे आत्मा म्हणूनी तया ।

त्यातें तुष्ट करा सुखी सकलही तुम्ही करा हो तया ॥

ऐसा बोध जनांस तो पटुनियां शिष्यत्व केलीं जनीं ।

झाला भिक्षु सती सुबोध करण्या लक्ष्मी त्वरें स्त्री जनीं ॥३॥

गेला बुद्ध हरी नृपाल-सदनीं त्यातें म्हणे भूपती ।

सांगें मी तुजला करीं श्रवण हें निर्गूण सेवेस ती ॥

झाली उत्सुक कीं प्रजा सकल तूं जावें निघूनी अतां ।

ऐके भूपति त्या म्हणे इथुन मी जाईन बाबा अतां ॥४॥

ढुंढीराज मला वदे म्हणुनि मी जातों असें बोलला ।

विष्णू त्यास वदे सदाशिव नृपा मुक्तीस नेई तुला ॥

ऐसें सांगुन ज्योतिषी म्हणतसे चिंता नको ही तुला ।

दीवोदास तदा निघे तिथुनियां जाई तपाला भला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP