मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३७

क्रीडा खंड - अध्याय ३७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

गृत्समदें कीर्तीला, विधियागाची समाप्ति कथियेली ।

तीच कथा भृगु मुनिंनीं, भूपति जो सोमकांत या कथिली ॥१॥

स्तुतिपूर्वक गणपति हा, प्रार्थुनि करिती सुतुष्ट सुरकांता ।

बोले तयांस गणपति, सतिची वाणी असत्य नच करितां ॥२॥

यासाठीं देवांनीं, साक्षेसी अंशरुप नदिठाईं ।

वास्तव्य तें करावें, उरलें देवत्व हें तयां येई ॥३॥

इतुकें प्रभु बोले तों, देव तिथें पातले प्रभूपाशीं ।

वदले गजाननाला, पुजिलें नाहीं विधी मखापाशीं ॥४॥

मानानें थोर अशी, सावित्री ही खरोखरी आहे ।

तिजवांचुन यागाला, केला आरंभ ही चुकी आहे ॥५॥

अपराधांची आम्हां, करणें देवा क्षमा असा भाव ।

यास्तव सुलीन-पणिं कीं, याचितसों त्वत्पदींच सद्‌भाव ॥६॥

देवांनीं त्या प्रभुला, शमिपत्रांनीं त्वरीत पूजियलें ।

पूजाग्रहण करुनियां, अपुल्या धामास तेधवां गेले ॥७॥

सुंदर पाषाणाची, मूर्ती निर्मित करीत ते देव ।

स्थापुन त्या स्थानासी, देती हेरंब हें तिला नांव ॥८॥

विधिनें तेथें अणखी, द्वादश वर्षें करुन तप-भावें ।

तोषुन प्रभूस त्यानें, केला मख सांग तेधवां भावें ॥९॥

कीर्ती शमिपत्राचें, महत्त्व जाणुन प्रभूस शमिपत्रीं ।

पूजन करुन केलें, पुण्यानें तूं सजीव सुत पुत्री ॥१०॥

जो कोणी भक्तीनें, ऐके शमिचें महात्म्य हे कीर्ती ।

विघ्नें नाशहि होउन, त्यांच्या इच्छा सुपूर्ण हो कीर्ती ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP