मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २६

क्रीडा खंड - अध्याय २६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

भीम व्याधाचा उद्धार कसा झाला ।

कथित व्यासाला रम्य वृत्त माला ।

भरतखंडीं तो वैदर्भ देश आहे ।

मंद नांवाचें एक नगर आहे ॥१॥

भीम नांवाचा व्याध तिथें नांदे ।

पापकर्मासी करीत असे मोदें ।

करी पापासी पृष्ठिं बाण-भाता ।

करीं तरवारी एक सुरा हाता ॥२॥

अशीं शस्त्रें तीं पारधीस घेई ।

व्याध कांतारीं नित्य असे जाई ।

बहुत श्वापदं कीं हनन करी भीम ।

मोट बांधुन तो नित्य बघे धाम ॥३॥

उदर पोषण हें करित कुटुंबाचें ।

तया ग्रामींचे दिवस उत्सवाचे ।

मांसविक्रय हा बहुत असा होई ।

म्हणुन श्वापदं कीं व्याध घरीं नेई ॥४॥

तया कांतारीं मनुज वास येई ।

असुर तेव्हां त्या समिप त्वरें येई ।

तया पाहुनियां गर्भगळित व्याध ।

चढे वृक्षीं तो त्वरित भीम व्याध ॥५॥

तया मागुनियां असुर चढे वृक्षीं ।

नाम होतें त्या शमिच असे वृक्षी ।

तयाभारानें मोडली असे ढाप ।

अतां दोघांचें संपलें असें पाप ॥६॥

तिचें ढापीचें पान पडे एक ।

तिथें देवाचे मस्तकींच ऐक ।

तळीं स्थापियली मूर्ति वामनानें ।

सहज दोघें निष्पाप पूजनानें ॥७॥

म्हणुन देवानें त्यांवरी कृपा केली ।

शुद्ध दोघांची त्वरित तनू झाली ।

दूत गणपतिचे नेत प्रभूपाशीं ।

वदे व्यासांसी विधी कथा ऐशी ॥८॥

देव भक्तीचा क्षुधित असे व्यासां ।

म्हणुन आवडला शुक्ल विप्र खासा

जाइ सदनासी भोजनाच साठीं ।

भक्ति विप्राची जडलि असे मोठी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP