मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ५८ - ५९

क्रीडा खंड - अध्याय ५८ - ५९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

राजपत्‍नीचें नाम असे अंबा ।

तिला कळली ही मात मुनी सांबा ।

जशी वायूनें केळ पडे खालीं ।

तशी शोकानें राज्ञि पडे खालीं ॥१॥

तिची मूर्च्छा ती सांवरी सखी जेव्हां ।

वदे दुःखानें राज्ञि असें तेव्हां ।

महोत्कट हा रक्षि अम्हां सिद्ध ।

म्हणुन युद्धासी नाथ होत सिद्ध ॥२॥

व्यर्थ उद्यम हा फुकट हसूं झालें ।

लघू-बाळाचे बोल मानियेले ।

व्यर्थ थोरासी युद्ध तिहीं केलें ।

म्हणुन फसले ते दुःखि मला केलें ॥३॥

अतां नाथांना कोण सोडणार ।

अगे अवनी तूं मीहि दीन नार ।

अशा शोकासी ऐकुनी सुरानंद ।

बहू गर्जोनी सिद्धीस करी सिद्ध ॥४॥

तियेकरवीं तो सैन्य करी सिद्ध ।

वदे सेनानी सैन्य असे सिद्ध ।

काय आज्ञा ती सांगणें देवराया ।

पूर्ण करितों मी त्वदिय बळें राया ॥५॥

प्रथम मजला कीं लागली क्षुधा ती ।

कांहिं भक्षाया देउनी निवारी ती ।

असें ऐकुनियां भक्षि असुरसैन्य ।

शीर अणणें त्या दैत्यपती मान्य ॥६॥

(साकी)

कालपुरुष हा घेउन आज्ञा सेनेसह तो जाई ।

सिंहनाद हा केला त्यानें असुरदला ठायीं ॥७॥

धृ० ॥सुन सुन मुनिभय्या कथन मनोरम गाया ।

भीषण रव हा ऐकुन भ्याली दैत्यपतीची सेना ।

कालपुरुष हा पाहुन झाली दैत्यपतीची दैना ॥८॥

दैत्यपतीचें दल हें सारें पळतें इकडे तिकडे ।

कालपुरुश हा धरितें सारें दीर्घ हस्तकीं तिडिके ॥९॥

एक घास कीं केली सेना पाहे भूप-मुरांचा ।

अवनीवरि तो जानु टेकुनी वीरासनिं हो साचा ॥१०॥

सोडी शर हे पर्जन्यासम त्या पुरुषावरती ।

भक्षुन शर ते नंतर ओढी असुरपती तो हस्तीं ॥११॥

अणिता झाला प्रभुपाशीं त्या जोडुन करांस वदला ।

भक्षुन दल तें नीच नरांतक चरणांसमीप अणिला ॥१२॥

आतां माझें उदर भरुनी झोंप येतसे भारी ।

विश्रांतीला स्थल हें द्यावें पूर्ण निवांतच भारी ॥१३।

ऐकुन प्रभु तो बोले त्याला शिरुनि मुखिं तूं माझें ।

विश्रांती तूं घेइं सुखानें देहिं अतां तूं माझे ॥१४॥

ऐकुन आज्ञा कालपुरुष तो शिरला वदनीं खासा ।

तेथें जाऊन लीन जाहला विधि हें सांगे व्यासां ॥१५॥

(शार्दूलविक्रीडित)

व्यासानें पुशिलें विधीस वहिलें ज्यानें दला ग्रासिलें ।

ज्यानें त्या धरिलें विनायक पुढें ज्यानें तिथें आणिलें ।

होता कोण पुरुष तो विधि बरें उत्पन्न केला कसा ।

बोले तो विधि ते धवा मुनिंस कीं वृत्तान्त आहे असा ॥१६॥

(गीति)

निर्गुण ब्रह्म असें जें, भूमीचा भार हरण करण्यास ।

दुष्टांच्या नाशासी, सगुण असा सूत होत कीं मुनिंस ॥१७॥

त्यासि विनायक म्हणतां, त्याच्या इच्छें जनीत तो पुरुष ।

त्या पुरुषानें सारें, भक्षण केलें दलास कीं हरुष ॥१८॥

एका नरांतकाविन, त्या पुरुषानें गिळून टाकियलें ।

काशीराजासहितही, अमात्यसुतही तसेच ते गिळिले ॥१९॥

तेथें त्यांनीं पुष्कळ, ब्रह्मांडें पाहिलीं मुनें साच ।

झाले खिन्न म्हणूनी, शरणांगत जाहले तिथें तोंच ॥२०॥

देवें प्रसन्न होउन, अपुल्या देहीं जनीत लघु-बाळ ।

केले सत्वर वाटे, काशीराजास दाखवी बाळ ॥२१॥

प्रभुच्या केशमुळांशीं, असलेलें छिद्र ती असे वाट ।

त्यांतून आले तीघे, बाह्यप्रदेशीं दिसे बहू थाट ॥२२॥

अपुली नगरी हर्षित, कश्यपनंदन करीतसे केली ।

काशीराजा पाहे, त्याची पूजा त्वरीत ती केली ॥२३॥

अपुल्या सतिला भेटे, दर्शन झालें तियेस नाथांचें ।

झाला मोद तियेला, व्यासां कथिलें सुवृत्त हें वाचे ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP