मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४१

क्रीडा खंड - अध्याय ४१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

अश्वासी देवांसी, देव गजानन हरीवरी बैसे ।

बहुविध शस्त्रें घेउन, राक्षस वीरांस देखिलें खासें ॥१॥

देव गजानन गर्जे, फिरवी परशू दुगसदा मारी ।

परशु न लागे त्याला, बळकट राक्षस खरोखरी भारी ॥२॥

झालें युद्ध तयांचें, शस्त्रांनीं तेधवां रणीं मोठें ।

वाटे असूर तेव्हां, अपयश येतें म्हणून हें मोठें ॥३॥

कुस्ती करितां दोघे, कुस्तीला योग्यसा नटे देव ।

प्रेक्षक तुंबळ युद्धा, पाहुन तनु कापली जसा घाव ॥४॥

नंतर गजाननानें, दूरासद ताडिला मुखावरती ।

मारुन बुक्की स्वबलें, असुर पडे तेधवां क्षितीवरती ॥५॥

मूर्च्छा आली त्याला, समय असो अस्तमानची वेळ ।

सावध झाला नंतर, शिबिरीं आला असूर त्यजि खेळ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP